शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सांगलीत ११ लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त : किराणा दुकानाच्या नावाखाली गोदाम; कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:00 AM

येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.

ठळक मुद्देमार्केट यार्डात छापा गुटखा व तंबाखूचा साठा कोठून आणला, तो कुठे विकला जाणार होता, याची सखोल चौकशी

सांगली : येथील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही चोरुन उत्पादन करुन त्याची विक्री सुरुच आहे. नानवाणी किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली. त्यावरून पिंगळे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सायंकाळी पाच वाजता तेथे छापा टाकला. यावेळी किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी गोदाम करण्यात आल्याचे दिसून आले.

येथून सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने गोदामाची झडती घेतल्यानंतर सुगंधित तंबाखू तसेच विविध कंपन्यांचा गुटखा सापडला. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याची मोजदाद सुरु होती. एकूण दहा लाख ६६ हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

नानवाणी याच्या किराणा दुकानाचा परवाना लाजम सिकंदर मुजावर यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परवाना अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु ठेवली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागच तपास करणार आहे. गुटखा व तंबाखूचा साठा कोठून आणला, तो कुठे विकला जाणार होता, याची सखोल चौकशी केली जाईल, असे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार राजू कदम, विजयकुमार पुजारी, जगू पवार, विद्यासागर पाटील, अमित परीट, युवराज पाटील, नीलेश कदम, संतोष कुडचे, सुनील लोखंडे, महादेव धुमाळ, शशिकांत जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, अनिल पवार, रोहन शहा, स्मिता हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.दोन वर्षानंतर पुन्हा छापादोन वर्षापूर्वीही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला होता. सोमवारी पुन्हा याच दुकानावर छापा टाकून साठा जप्त केला. यावरुन हे दुकान गुटखा आणि तंबाखू विक्रीचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कारवाई केली जात आहे; पण ही विक्री थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.सांगलीच्या मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेfraudधोकेबाजी