आष्ट्यात उच्चांकी १०९ रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:39+5:302021-07-05T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आष्टा येथे जायंट्स ग्रुप ऑफ ...

आष्ट्यात उच्चांकी १०९ रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आष्टा येथे जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा व ‘लोकमत’च्यावतीने आयोजित ‘रक्ताचं नातं’ या महायज्ञास शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०९ रक्तदात्यांनी उच्चांकी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन आष्ट्याचे अतिरिक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, जायन्ट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड, डॉ. मनोहर कबाडे, डॉ. सतीश बापट, डॉ. दीपक लिगाडे, डॉ. अनिल निर्मळे, डॉ. प्रवीण वंजाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जायन्ट्सचे सचिव प्रा. सूर्यकांत जुगदर, बाबासाहेब सिद्ध, विलासराव पाटील, एन. डी. कुलकर्णी, चारुदत्त वठारे, दत्तात्रय सोकाशी प्रमुख उपस्थित होते.
वंजाळे हॉस्पिटल, दिलीप कोळी, रुहानिया मदरसाचे अझरुद्दीन मुजावर, यश क्लासेसचे भूषण भासर, सांगली जिल्हा नेहरू युवा फेडरेशनचे श्रेयश शिराळकर, नशाबंदी मंडळाचे सागर ढोले, ज्ञानदेव पवार, नितीन मोरे, अजय मोरे, सुरेंद्र शिराळकर यांनी संयोजन केले.
यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, डॉ. विपुल गुरव, डॉ. दीपक लिगाडे, पालिकेचे अधिकारी शिरीषकुमार काळे, सचिन मोरे, यांच्यासह कार्तिक शेट्टी, शिवाजी पाटील, शेखर कांबळे, सुशांत डोंगरे, वहीद मुजावर, राहुल पाटील, समीर इनामदार, पुरुषोत्तम पाटील, आरिफ फकीर, साजिद मुलानी, अझरुद्दीन मुजावर, इरफान मनेर, शहाजान जमादार, सतीश झंवर, राहुल मोरे, दीपक मेथे-पाटील, सुजित शिंदे, मुदस्सर फकीर, शिवराज पाटील, संजय लांडगे, जालिंदर गडदे, संभाजी हजारे, प्रतिश चोपडे, अभिषेक साळुंखे, यश खुडे, शीतल होरे, मंगेश दिवे, बालाजी पांचाळ, शुभम कांबळे, कृष्णा सराफले, इम्रान मनेर, प्रदीप पवार, निखिल कांबळे, ओंकार कुलकर्णी, दिलीप अवघडे, रतन धेंडे, दिलीप डोंगरे, अक्षय धरोन, सिद्धराम धुत्तरागो, जगदीश देसाई, एजाज तांबोळी, असर कुराडे, आत्माराम पवार, शब्बीर मुजावर, केतन जाधव, वृषभ कोरेगावे, सम्मेद हालुंडे, स्वप्निल चौगुले, प्रीतम मालगावे, अभय लिगाडे, ओमकार सोकाशी, वर्धन हाके, प्रतीक शिंदे, प्रकाश बागेवाडीकर, साहिल मुजावर, जुबेर मुजावर, यश सावळवाडे, पवन बारूकर, जयेश भोई, अभिजित जाधव, राहुल पोळ, स्वरूप जाधव, ऋषिकेश बनसोडे, संग्राम आटुगडे, अभिजित कोळी, अजित माने, विजय बावडेकर, नागेश होलकाई, शंकर वालकर, मोहसिन फकिर, साजिद सय्यद, शंकर हडपद, प्रथमेश जाधव, अजित गायकवाड, सौरभ नवले, लक्ष्मण पवार, विनायक पाटील, आनंदा मनवेर, वैभव पांढरे, संजय भिलवडे, हर्षल कापसे, संदीप सोकाशी, अमित कोळी, ऋतुराज जुगदर, नीलेश पाटील, नितीन पाटील, दीपाली हालुंडे, अविला हालुंडे, सुनील काळोखे, सुजय डुबल, मनोज जासूद, नितीन मोरे, पवनकुमार पवार, आनंद पाटील, शेखर पाटील, सलमान मुल्ला, पवन देवर्डे, दीपक गरगोटे, विश्वजीत पाटील, सूरज पवार या १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चौकट
वैभव शिंदे यांचे ७७ व्या वेळी रक्तदान
अतिरिक्त तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांनी प्रथमच रक्तदान केले. तर आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी ७७ व्या वेळी रक्तदान केले. तसेच दीपाली हालुंडे व अविला हालुंडे या ननंद भावजय यांनी प्रथमच रक्तदान केले. जायन्ट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड यांच्या कारकिर्दीत कोरोना काळात सुमारे २७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.