जिल्ह्यात १०३७ नवे रुग्ण; १७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:36+5:302021-07-16T04:19:36+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट होत नवे १,०३७ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १५ अशा १७ जणांचा ...

1037 new patients in the district; 17 killed | जिल्ह्यात १०३७ नवे रुग्ण; १७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १०३७ नवे रुग्ण; १७ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट होत नवे १,०३७ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १५ अशा १७ जणांचा मृत्यू झाला, तर ८१४ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.

बुधवारी बाराशेवर पोहोचलेल्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी हजारावर रुग्णसंख्या असल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यातील १५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली, मिरज प्रत्येकी १, वाळवा ५, कडेगाव ३, खानापूर २, जत, पलूस आणि तासगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत सध्या १० हजार २८८ जण उपचार घेत आहेत, त्यातील १,०४२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ८८८ जण ऑक्सिजनवर तर १५४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत ४,२०१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यात ३५५ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ९,७१७ जणांच्या तपासणीतून ७०० जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील दाेघांचा मृत्यू झाला तर नवे १८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,६१,३१४

उपचार घेत असलेले १०,२८८

कोरोनामुक्त झालेले १,४६,६८८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,३३८

पॉझिटिव्हिटी रेट ८.४५

गुरुवारी दिवसभरात

सांगली १५६

मिरज ३३

आटपाडी ६०

कडेगाव ५५

खानापूर ८४

पलूस ५७

तासगाव १००

जत ४९

कवठेमहांकाळ ९६

मिरज तालुका १३०

शिराळा ६२

वाळवा १५५

Web Title: 1037 new patients in the district; 17 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.