शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पूर, अतिवृष्टीमुळे सांगलीत एसटीला १० लाखांचा फटका, ८२५ फेऱ्या रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:18 IST

सर्वाधिक नुकसान इस्लामपूर आगाराचे

सांगली : जिल्ह्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे एसटीच्या जिल्ह्यातील दहा आगारांतील ८२५ फेऱ्या रद्द होऊन तब्बल दहा लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे.सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती, तसेच राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीने बसवाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्याच्या दहा आगारांतून विविध भागांत धावणाऱ्या ‘लालपरी’ची चाके थांबली आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्या अनेक मार्गांवरील एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. २८ जुलै रोजी जिल्ह्यातील ८२५ बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यातून १० लाख २३ हजार १३६ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

कोणत्या मार्गावरील वाहतूक बंद

  • सांगली आगारातून जाणाऱ्या स्वारगेट, सातारा व विनावाहक कोल्हापूर बसेस बंद झाल्या आहेत.
  • मिरज आगारातून कोल्हापूर, इचलकरंजी, माखजन व स्वारगेट फेऱ्या बंद झाल्या आहेत.
  • इस्लामपूर आगारातून कोडोलीकडे जाणाऱ्या फेऱ्या ऐतवडेपर्यंत बंद झाल्या.
  • तासगाव आगारातून पणजी व जोतिबापर्यंत फेऱ्या बंद
  • जतमधून रत्नागिरी, सांगली व कोल्हापूर फेऱ्या बंद
  • आटपाडीतून चिंचणीमार्गे मिरजपर्यंत वाहतूक बंद
  • शिराळा आगारातून कोडोली, कांडवण, बांबवडेपर्यंत बंद
  • पलूसमधून कोल्हापूर, इस्लामपूरपर्यंत वाहतूक बंद. काही मार्गांत बदल

आगारनिहाय रद्द फेऱ्या व आर्थिक नुकसानआगार - रद्द फेऱ्या - बुडालेले उत्पन्नसांगली - २२६ - १,७५, ११०मिरज - १६४ - १,९३,६६६विटा - ६४ - १,११,१,०९इस्लामपूर - १२० - २,२८,३५९तासगाव - १८ - २६,०२६क.महांकाळ - ५५ - ९४,९१६शिराळा - ९८ - ९७,५६७पलूस - ७२ - ७२,४७८

४४६५१ किलोमीटरच्या फेऱ्या रद्दजिल्ह्यातील सर्व दहा आगारांमधून ४४ हजार ६५१ किलोमीटरपर्यंतच्या ८२५ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात सर्वाधिक इस्लामपूरमधून १० हजार ८२० किलोमीटरपर्यंतच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर