शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अबब.. १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी कृष्णा नदीत; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:25 IST

..या गावांचे आरोग्य धोक्यात

सांगली : सांडपाणी प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे गेली महिनाभर सांगलीच्या कृष्णा नदीत दररोज १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी मिसळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आल्याने धक्का बसला आहे. याप्रकरणी महापालिकेवर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.सांगलीच्या ज्योतीरामदादा आखाड्याजवळ महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. या स्टेशनपासून पाच पंपाद्वारे संपूर्ण सांगलीच्या दक्षिण भागातील सांडपाणी हनुमाननगरच्या प्रक्रिया प्रकल्पात जाते. प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेवर सोपविली गेली आहे, असे भोसले यांनी सांगितले. १५ सप्टेंबरपासून येथील पंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील सर्व म्हणजे १ कोटी लिटर मैलामिश्रित सांडपाणी दररोज कृष्णा नदीत मिसळत आहे.याशिवाय हनुमाननगरच्या प्रकल्पातून शुद्धीकरण झालेले पाणीही भोबे गटारीत सोडण्याचा प्रकारही समोर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी एस. जे. हरबड यांनी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला दिला आहे. पंपिंग स्टेशन कार्यान्वित नसल्याची बाब ठेकेदार किंवा महापालिकेला माहिती नव्हती. त्यामुळे ठेकेदार व या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अभिजित भोसले यांनी केली आहे.

..या गावांचे आरोग्य धोक्यातसांगलीत कृष्णा नदीत मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे हरीपूर, अंकली, धामणी, बामणी आदी गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली महिनाभर नदीचे प्रदूषण सुरू असताना याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखलनदी प्रदूषणप्रकरणी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला यापूर्वीच ३३ कोटींचा दंड ठोठावला आहे. याशिवाय दररोज १ लाख रुपये दंड सुरूच आहे. अशातच आता नव्याने हरीपूर नाल्यातून होणारे प्रदूषण वाढल्याने त्याची दखलही मंडळाने घेतली आहे. याप्रकरणी महापालिकेला पुन्हा दंड होऊ शकतो.

दंड अधिकारी, ठेकेदाराला करावामहापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड ठोठावला तर त्याचा भार नागरिकांवर पडतो. त्यामुळे मंडळाने हा दंड जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर करावा, अशी मागणी अभिजित भोसले यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण