जुलैपासून वाढेल तुमचं मोबाइल बिल, प्रिपेड टॉकटाईमही होणार कमी!
By Admin | Updated: May 20, 2017 17:24 IST2017-05-20T17:24:49+5:302017-05-20T17:24:49+5:30
जुलैत जीएसटी लागू झाल्यावर फोन बिल तर वाढेलच, हॅण्डसेटही महाग होतील.

जुलैपासून वाढेल तुमचं मोबाइल बिल, प्रिपेड टॉकटाईमही होणार कमी!
- निशांत महाजन
मोबाइल ही जिवनावश्यक गरज आहेच, मोबाइल शिवाय जगण्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. त्यात बिल किती वाढतं, आपल्या प्रिपेडचा टॉक टाईम कुठं जातो याचं तर गणितच नाही. पण तुम्ही मोबाइलचा अतिवापर करत असाल आणि लंबी बात करत मोबाइल डेटा उडवत असाल तर सावध व्हा. जुलैपासून तुमचं मोबाइल बिल आतापेक्षा जास्त येऊ शकेल. आणि हॅण्डसेट घेण्याचा विचार असेल तरी जरा महागात पडेल. कारण जीएसटी लागू झाल्यावर यावरचा टॅक्स वाढणार आहे.
फोन बिलवर १८ आणि हॅण्डसेटच्या किमतीवर १२ टक्के टॅक्स लागणं अपेक्षित आहे. सध्या पोस्ट बिलवर आपण १५ टक्के टॅक्स देतो. म्हणजे जर तुम्हाला १००० रुपये बिल दरमहा येत असेल तर जुलैपासून ३० रुपये त्यात टॅक्स द्यावा लागेल. तेच प्रिपेडचंही. आता १०० रुपये रिचार्ज केलं तर ८५ रुपयांचा टॉकटाईम मिळतो तो जुुलैनंतर ८२ रुपयांचा मिळेल. या निर्णयामुळे मोबाइल उद्योग आणि टेलकॉम सेवा देणाऱ्यांमध्ये चिंता आहे. पण आपणही खबरदारी घेवू, आपलं बिल जरा सांभाळू, जरा नजर ठेवू की आपल्याला किती बिल येतं दरमहा, तेवढं बोलणं खरंच गरजेचं असतं का?