(Image Credit : CBS News)
गॉसिप करणे तर प्रत्येक समाजाला आणि देशातील लोकांना मजेदार वाटतं. खारकरुन गॉसिप आणि महिला असं समीकरणही सांगितलं जातं. पण याचा अर्थ हा अजिबात होत नाही की, पुरुष गॉसिप करत नाहीत. कॉलेजमध्ये शिकणारे तरुण-तरुणी असो किंवा नोकरी करणारे लोक असो वा परिवारातील लोक असो हे स्वत:ला गॉसिप करण्यापासून रोखू शकत नाहीत. कुणासोबत बोलता बोलता कधी आपण कुणाबाबत गॉसिप सुरु करतो हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. पण गॉसिंपिंगमध्ये लोकांना इतकी मजा का येते? का त्यांना गॉसिप करणं इतकं आवडतं? चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं...
स्वत:ची खोटी समजूत
अनेक शोधांमधून असं आढळलं आहे की, जे लोक स्वत:बाबत आनंदी नसतात किंवा त्यांना त्यांच सुरु असलेलं लाइफ आवडत नसतं. ते जेव्हा दुसऱ्यांबाबत नकारात्मक निष्कर्ष काढतात किंवा त्यांच्याबाबत गॉसिप करतात तेव्हा त्यांना काही वेळापुरतं चांगलं वाटतं. ते यातून स्वत:ची खोटी समजूत काढत असतात.
मूड चांगला करण्यासाठी
जेव्हा लोक ज्ञान आणि विचारांवर आधारित संवाद साधू शकत नाहीत, तेव्हा ते नेहमी गॉसिप करणे सुरु करतात. त्यांना असं वाटत असतं की, याने लोकांचा मूड चांगला होतो. ते यात अनेकदा यशस्वीही होतात.
ईर्ष्येतून बाहेर येण्यासाठी
अनेकजण काही लोक दुसऱ्यांचं यश, लोकप्रियता पाहून जळत असतात. अशांबाबत नकारात्मक गॉसिप करुन ते ईर्ष्येतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात.
समूहाचा भाग होण्यासाठी
काही लोक गॉसिप यासाठी करतात की, त्यांना एखाद्या समूहाचा किंवा ज्यांच्याबाबत गॉसिप करत आहेत त्या समूहाचा ते भाग आहेत. किंवा आपण त्या समूहाचा भाग आहोत असं त्यांना दाखवायचं असतं.
रागातून किंवा दु:खातून बाहेर येण्यासाठी
अनेकदा काही लोक त्यांच्या मनात वेगवेगळ्या कारणांनी दडलेल्या भावना किंवा रागाला बाहेर काढण्यासाठी गॉसिप करतात. तर काही लोक त्यांचं दु:खं बाहेर काढण्यासाठी गॉसिप करतात.
केवळ महिलाच नाहीत करत गॉसिप
सामान्यपणे हेच मानलं जातं की, महिलाच जास्त गॉसिप करतात. पण एका शोधातून असं समोर आलं आहे की, पुरुष महिलांपेक्षा जास्त वेळ गॉसिप करण्यात घालवतात. या शोधानुसार, महिला सरासरी दररोज ५२ मिनिटे गप्पा मारतात, तर पुरुष साधारण ७६ मिनिटे गप्पा मारतात.