शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

का वाटतो मुलांना एकटेपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 17:55 IST

बोला मुलांशी. अनेक गोष्टी तुम्हाला समजून येतील..

ठळक मुद्देमुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

- मयूर पठाडेआनंदी असणं, राहाणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं सजगही राहायला हवं. आपली मुलंही आनंदी असावीत, त्यांच्यामागे टेन्शनचा भुंगा नको, असं आपल्याला कितीही वाटत असलं, तरी आपणही त्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे..आजच्या फास्ट जगात प्रत्येकाचीच मुलांकडून इतकी काही अपेक्षा आहे की त्यासाठी मुलांना धावाधाव करावीच लागते. या चक्रात गुरफटल्यानंतर त्यातून वेळीच बाहेर पडता नाही आलं किंवा त्याला तोंड देता नाही आलं तर मुलांना नैराश्य येतं आणि त्यात मग ते होरपळून निघतात.आजकाल मुलंही खूप टेन्शनमध्ये दिसतात. त्यामागे अनेक कारणं आहेतच, पण त्या कारणांचा निचराही करता येऊ शकतो. पालकांनी याबाबत दक्ष राहाणं गरजेचं आहे.काय करता येईल?१- मुलांशी पालकांचा संवाद असलाच पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मुलांशी अर्थपूर्ण संवाद केला पाहिजे. मुलांना सगळं काही घेऊन दिलं, त्यांना पाहिजे तिथे अ‍ॅडमिशन मिळाली, ती शाळा, कॉलेजात जाताहेत, म्हणजे सारं काही आलबेल आहे, आणि आपली जबाबदारी संपली असं नाही. मुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.२- आणखी एक आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी सुसायडल टेन्डन्सीबद्दल बोललंही पाहिजे. आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अनेकांना वाटतं, मुलांशी आत्महत्येसारख्या गोष्टींवर बोलणं म्हणजे त्यांना स्वत:हून त्या गोष्टीची ‘आयडिया’, जाणीव करुन देणं. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, उलट अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.३- मुलांचा एकटेपणा घालवायला हवा. आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिज. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मुलं बाहेर जातील, मित्रमंडळीत रमतील यासाठी तसं वातावरण निर्माण करायला हवं.४- अभ्यासकांचं म्हणणं आहे, नैराश्य येण्याचं वय हळूहळू खूपच खाली येत चाललंय आणि अगदी बारा वर्षाच्या आतील मुलंही आता आत्महत्या करू लागलीत. त्याचंही प्रमाण बरंच मोठं आहे. त्यामुळे आपल्या मुलाला नैराश्य येऊच शकत नाही, या गैरसमजातून आपण बाहेर यायला हवं.