​VIDEO : ...अखेर तिच्या जिद्दीपुढे नमते घेत चोर गाडी सोडून पळाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:56 IST2017-05-27T10:26:08+5:302017-05-27T15:56:08+5:30

चोरांचे भय एवढे संपले असून वाहनधारकाच्या समोर गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला जातो.

VIDEO: ... finally stopping her for a long time, the thief ran away from the car! | ​VIDEO : ...अखेर तिच्या जिद्दीपुढे नमते घेत चोर गाडी सोडून पळाला !

​VIDEO : ...अखेर तिच्या जिद्दीपुढे नमते घेत चोर गाडी सोडून पळाला !

चाकी, चारचाकी वाहने चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरांचे भय एवढे संपले असून वाहनधारकाच्या समोर गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला जातो. असाच प्रयत्न एका चोराने केला मात्र तिच्या जिद्दीपुढे नमते घेत चोराला गाडी सोडून पळावे लागले. 
झाले असे की, एका महिलेने पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. काही सेकंदासाठी गाडी अनलॉक करून वस्तू घेण्यासाठी ती गाडीतून खाली उतरली. ती गाडीतून बाहेर पडत नाही तोच चोराने तिच्या निष्काळजीपणाचा फायदा उठवत तिची नवी कोरी गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण ही महिला धाडसी होती म्हणून ठिक. त्यामुळे आपल्या चालत्या गाडीच्या बोनेटवर चढून तिने ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल जराही गेला असता तरी गाडीखाली येऊन ती मृत्युमुखी पडली असती पण तिने धाडसाने आपली गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्या जिद्दीपुढे नमतं घेत चोराने गाडी थांबवली आणि तिची गाडी सोडून शेजारी उभी असलेली दुसरी गाडी पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Web Title: VIDEO: ... finally stopping her for a long time, the thief ran away from the car!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.