VIDEO : ​अ‍ॅन्टी रोमियो पथकाने केल्या सर्व सीमा पार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 17:05 IST2017-05-24T11:35:00+5:302017-05-24T17:05:00+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अ‍ॅन्टी रोमियो पथक दोन प्रेमींवर अत्याचार करताना दिसत आहे.

VIDEO: Crossing all the borders done by the Antioch Romeo squad! | VIDEO : ​अ‍ॅन्टी रोमियो पथकाने केल्या सर्व सीमा पार !

VIDEO : ​अ‍ॅन्टी रोमियो पथकाने केल्या सर्व सीमा पार !

िला सुरक्षेच्या नावावर प्रेमींना त्रास देणे आता तर फॅशनच झाली आहे. आपण अ‍ॅन्टी रोमियो पथकाच्या मनमानीबाबत फक्त ऐकले असेल मात्र त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली नसेल. 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अ‍ॅन्टी रोमियो पथक दोन प्रेमींवर अत्याचार करताना दिसत आहे आणि बिचारे ते प्रेमी त्यांच्या कडून हात जोडून विनंती क रीत आहेत. 
पथकाने त्यांना सांगितले की, लग्न करु न घ्या, तर मुलगा म्हणतो की, आम्ही लग्न करु मात्र आता नाही नंतर. यानंतरही त्यांना काठीने मारहाण करण्यात आली. मुलगी जेव्हा रडून रडून थकली तरीही तिच्यावर त्यांनी दया दाखविली नाही. हे पाहून तिने मात्र त्यांच्यावर खूप संताप व्यक्त केला. मात्र त्यांनी याउलट त्यांना पुन्हा मारहाण सुरु केली. 
हा व्हिडिओ पाहून आपणास अ‍ॅन्टी रोमियो पथकाची काम करण्याची पद्धत सहज लक्षात येऊ शकतो. हा व्हिडिओ अखिलेश यादव फॅन्सच्या फेसबुक पेजद्वारे शेअर करण्यात आला आहे.  

Web Title: VIDEO: Crossing all the borders done by the Antioch Romeo squad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.