शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

True love story : अपघातात हात पाय गमावले; नशीबानं साथ सोडली पण 'ती' सोबत उभी होती; प्रेम कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 19:05 IST

True love story of Dawood and Sana doctors removed Dawood limbs but Sana did not leave him : सना नावाची तरूणी प्रेमात पडली तेव्हा त्या प्रेमासोबत तिच्या वाट्याला त्रास, दु:खही आलं. मात्र, ती त्रास आणि नशिबासमोर हरली नाही. तिने त्या दु:खाला आपलं मानत नियतीशी दोन हात करायचं ठरवलं.

आतापर्यंत तुम्ही अनेक लव्हस्टोरीज वाचल्या असतील. प्रेम सगळेचजण करतात, त्याचं रूपातंर लग्नात होतं. या सगळ्यात नातं टिकवणं खूप अवघड असतं.  खूप कमी लोक कठीण परिस्थितीत आपल्या जोडीदाराच्या सोबत  राहतात. अशीच एक आगळी वेगळी लव्हस्टोरी (True Love story of Dawood and Sana) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  पाकिस्तानच्या सना नावाच्या तरुणीने सर्वाचं मन जिंकलं असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सना नावाची तरूणी प्रेमात पडली तेव्हा त्या प्रेमासोबत तिच्या वाट्याला त्रास, दु:खही आलं. मात्र, ती त्रास आणि नशिबासमोर हरली नाही. तिने त्या दु:खाला आपलं मानत नियतीशी दोन हात करायचं ठरवलं. तिच्या या धाडसामुळे सना आज जगभरात नावाजली आहे. अनेक लोक सनाच्या मदतीसाठी धावून येत आहेत. सना आणि दाऊद यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात दाऊदच्या कुटुंबियांनी सना आणि तिच्या कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं. दोघांच्या लग्नाची धावपळ सुरु होती. लग्न जुळवण्याचं काम सुरु होतं. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. 

ज्या दिवशी  सना आणि तिचे कुटुंबिय दाऊदच्या घरी येणार होते त्याच रात्री दाऊद एका विजेच्या खांब्याला धडकला. या दुर्घटनेत दाऊद पूर्णपणे जळाला. त्यानंतर त्याला बर्न युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने अनेकांना मोठा धक्का बसला. दाऊदला जिवंत ठेवायचं असेल तर त्याचे दोन्ही हात आणि एक पाय कापावा लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.    हे ऐकूनच दाऊदच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पण काहीही पर्याय नसल्यानं दाऊदचे दोन्ही हात आणि एक पाय कापावा लागला.

ती सध्या काय करते! अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या घटस्फोटीत पत्नीने केले एका शिक्षकासोबत लग्न

सनाला दाऊदच्या अपघातविषयी जशी माहिती मिळती तशी ती आपल्या बहिणीसह रुग्णालयात पोहोचली. त्याची स्थिती  बघून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. दाऊदला खरंतर चिंता होती. आता या दुर्घटनेमुळे सना आपल्याला स्वीकारेल की सोडून जाईल? असा प्रश्न त्याला सतावत होता. कारण त्याच्या बाजूच्या बेडवर असलेल्या रुग्णाच्या पायाचा एक बोट कापला गेल्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्न मोडलं होतं. पण सनाने तसं केलं नाही. दाऊदला सोडणार नाही, असं सनाने ठरवलं. दाऊद वाचणार नाही, असं जवळपास दीड महिने डॉक्टर सांगत होते. पण तरिही तिनं  हिंमत न  हारता परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं. 

"गर्लफ्रेंड एक्सचे कपडे धुते, जेवणही देते अन् विचारते...!" बॉयफ्रेंडनं सांगितली धक्कादायक गोष्ट

या घटनेनंतर सनाच्या कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला. मात्र, सनाने हार मानली नाही. तिने दाऊत सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करणं फार कठीण होतं. अखेर दोघांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. सना आणि दाऊदची ही प्रेम कहाणी ऐकून जगभरातील अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.  नेटिझन्स या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. कलियुगात खऱ्या प्रेमाचं उदाहरण जगाला पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तान