शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

पार्टनरला गमावण्याची भीती वाटते? तर 'हा' फंडा वापराल तर नातं जास्तवेळ टिकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 12:17 IST

अलिकडे सगळेच मुलं आणि मुली रिलेशनशीपमध्ये असतात.

अलिकडे सगळेच मुलं आणि मुली रिलेशनशीपमध्ये असतात. फार क्वचीत लोकं असे दिसून येतात कि त्यांचा पार्टनर नसतो. पण जे कपल्स रिलेशनशीपमध्ये असतात. त्या सगळ्यांची नाती टिकतातच असं नाही. कारण अनेक कपल्सचे एकमेकांवर खूप प्रेम असून सुद्धा त्यांना एकमेकांपासून दूर जावं लागतं. त्यामागे अनेक कारणं असतात पण जर तुम्ही  चांगल्या रिलेशनशीपमध्ये असाल आणि तुम्हाला  पार्टनरला गमावण्याची भीती वाटतं असेल तर आज आम्ही तुम्हाला  काही टीप्स सांगणार आहोत.  ज्यांचा वापर करून तु्म्ही तुमच्या नात्याला ब्रेकअप होण्यापासून वाचवू शकता.  

(image credit-rebel circus)

बोलताना व्यवस्थित बोला

(image credit- fatherhood channel)

 कधी कधी आपण आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवून असतो की आपण जे बोलत आहोत त्या मागचा अर्थ त्या व्यक्तीला समजायला हवा. पण काहीवेळा असं होतं नाही त्यामुळे तुमच्यात गैरसमज होऊ शकतात. अशा वेळी वाद टाळण्यासाठी  समोरच्या व्यक्तीशी बोलताना काही उदाहरणं देत आपलं म्हणणं पटवून द्या.  ज्यामुळे तुमचं म्हणणं पार्टनरला चांगल्या पध्दतीने कळेल.( हे पण वाचा-मुलं स्टायलीश नाही तर 'अशा' मुलींना करतात लाईक)

बॉडी लॅग्वेजकडे लक्ष असु द्या

(image credit-consious life news)

जर पार्टनरशी बोलत असतान तुमची शरीरयष्टी सकारात्मक असेल तर तुमची चर्चा सुद्धा सकारात्मक होईल. त्यासाठी बोलत असताना तुमचे हावभाव आणि शरीरयष्टी  व्यवस्थित ठेवा.  बोलत असताना  हातांची हालचाल करा. पण हे करत असताना आपल्या हातांवर नियंत्रण ठेवा. त्यामुले तुमच्याशी बोलत असताना पार्टनरला उत्साह येईल.

विश्वासात घ्या

(image credit- tipsonlifeandlove)

कोणतीही गोष्ट आपल्या पार्टनरशी शेअर करत असताना लाजू नका.  कारण जर तुम्ही  पार्टनरपासून काही लपवत असाल तर  पार्टनरला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून विश्वासात घेऊन  न घाबरता पार्टनरला सगळ्या ऑफिस मधील तसंच घरच्या जीवनातील गोष्टी शेअर करा.  कारण जर तुमच्या कोणत्याही गोष्टीवर पार्टनरला डाऊट असेल तर  तुमच्या समोरासमोर क्लिअर केल्यास उत्तम ठरेल. कारण जर तुम्ही पार्टनरशी काही गोष्टी लपवून ठेवाल तर तेच तुमच्या ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. ( हे पण वाचा-लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा. )

पार्टनरच्या जागी  स्वतःला ठेवा

(image credit- the morden man)

अनेकदा  तुमचा पार्टनर तुम्हाला  काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तुम्हाला ते पटत नाही. अस जर तुमच्या बाबतीत होत असेल तर रागाच्या भरात निर्णय घेण्याची घाई करू नका.  स्वतःला पार्टनरच्या जागी ठेवा मगच आपलं मत मांडा. कारण  स्वतःचा विचार करत असताना आपण पार्टनरच्या मनस्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे पार्टनर दुरावण्याची शक्यता असते

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप