शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन नात्यात सिरिअस होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 11:19 IST

ऑनलाइन डेटिंग वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि चॅटींग अॅप्सच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येत आहेत.

(Image Credit : Daily Mail)

इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे तरुणाई सध्या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली जात आहे. ऑनलाइन डेटिंग वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि चॅटींग अॅप्सच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. अनेकदा असेही पाहिले जाते की, ऑनलाइन संवादातून लोक एकमेकांच्या इतके जवळ येतात की, रिअल लाइफमध्येही भेटण्याचा आणि डेटिंगचा सिलसिला सुरु होतो. अशात मुला-मुलींसाठी हे जाणून घेणं अवघड होतं की, ऑनलाइन चांगल्या दिसणाऱ्या किंवा वागणाऱ्या लोकांमध्ये कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही. त्यामुळे ऑनलाइन नात्यामध्ये सिरिअस होण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते. 

खासगी माहिती आणि फोटो-व्हिडीओ देणे

ऑनलाइन संवाद साधताना तुम्ही कितीही चांगले मित्र असाल तरी सुद्धा खासगी माहिती शेअर करणे टाळावे. तसेच खाजगी फोटोज किंवा व्हिडीओ सुद्धा शेअर करु नका. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्ही इम्प्रेस झालात याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची सर्व खाजगी माहिती त्याच्याशी शेअर करावी. इथे खासगी माहितीचा अर्थ तुमच्या घराचा पत्ता, ऑफिस, शाळा किंवा कॉलेजचा पत्ता असाही आहे. 

गोड बोलण्याला फसू नका

ऑनलाइन विश्वात प्रत्येक व्यक्ती फार काळजीपूर्वक आपली प्रतिमा समोर ठेवत असतो. त्यामुळे ऑनलाइन संवाद साधताना कुणाचाही हाच प्रयत्न असतो की, समोरची व्यक्ती आपल्यावर इम्प्रेस झाली पाहिजे. कुणाच्या बोलण्यात किती सत्य आणि किती खोटं आहे हे जाणून घेता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन संवाद साधतांना कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या ऑनलाइन पर्सनॅलिटीनुसार जज करु नका. 

प्रश्नांच्या उत्तरावर लक्ष द्या

जेव्हा तुम्ही ऑनलाइन कुणाशी भेटता तेव्हा संवादादरम्यान तो तुमच्याशी काय बोलतो यावर लक्ष द्या. जर काही प्रश्न विचारल्यावर तुम्हाला एकाच प्रश्नांची दोन उत्तरे मिळत असतील तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या पूर्ण बोलण्याने तुम्ही संतुष्ट होत नाहीत, तोपर्यत त्यावर विश्वास ठेवू नये. 

कोणत्याही माहिती विना सिरिअस होऊ नये

ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात अडकणे काही नवीन गोष्ट नाही. पण ही बाब केवळ संवादापुरती ठेवली तरच चांगलं आहे. ऑनलाइन भेटलेल्या व्यक्तीसोबत लग्नाचा विचार करणे थोडं अवघड आहे आणि तेही जेव्हा तुम्ही त्याला किंवा तिला भेटलाच नाहीत. जर तुम्ही ऑनलाइन भेटलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडलाही असाल तर त्यांची संपूर्ण माहिती, सगळ्या गोष्टींची खात्री करुन घेतल्यानंतरच नातं पुढे न्यावं. 

भेटण्याची घाई

ऑनलाइन चॅट करणे एकावेळी ठिक आहे. अर्थात कुणाशी तुम्हाला कुणाशी बोलणं आवडत असेल तर त्या व्यक्तीला भेटलही पाहिजे. पण यासाठी घाई करु नका. ही घाई तुम्हाला महागात पडू शकते. समोरची व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीतही असू शकते. तुमची फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे समोरची व्यक्ती भेटण्यासाठी फार जास्त दबाव टाकत असेल तर त्याची ही मागणी काही कारणे देऊन टाळू शकता. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपonlineऑनलाइनPersonalityव्यक्तिमत्व