नातं संपवायचं असतं तेव्हा अशा गोष्टी करू लागतात पार्टनर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:09 IST2019-03-14T13:08:44+5:302019-03-14T13:09:14+5:30
लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

नातं संपवायचं असतं तेव्हा अशा गोष्टी करू लागतात पार्टनर!
(Image Credit : Lifehack)
लग्नानंतर संसार हा दोघांनी करायचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. पण काही महिला आणि पुरूष असे असतात जे या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याने घरात एक अनहेल्दी वातावरण तयार होतं आणि याने नातं प्रभावित होतं. जेव्हा नातं संपवायचं असतं तेव्हा काही लोक कसे वागतात याचे काही संकेत खालीलप्रमाणे सांगता येतील.
प्राथमिकता
काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला प्राथमिकता देत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाबाबत पूर्णपणे विसरून जातात. त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी जे काही करतो त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा महिला किंवा पुरूष आपल्या पार्टनरचे आभार मानत नाहीत आणि त्यांची काळजीही करत नाहीत. या लोकांच्या प्राथमिकता बदललेल्या असतात.
कमीपणा दाखवणे
काही महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरला दुसऱ्यांसमोर कमी लेखतात. आपल्या पार्टनरबाबत वाईट बोलणे किंवा त्यांचा अपमान करणे तुमच्या नात्यात अडचणीचं कारण ठरू शकतात. त्यांच्या कमजोरींची खिल्ली उडवण्याऐवजी त्यांना प्रेरित करा. याने नातेवाईकांमध्ये चुकीच्या धारणा जातात.
नेहमी भांडणाची कारणे शोधणे
ज्या महिला आणि पुरूषांना त्यांचा संसार सोडायचा आहे ते नेहमी त्यांच्या पार्टनरमध्ये नेहमी दोष शोधत असतात. याने पार्टनरला संकेत दिला जातो की, ते खूश नाहीयेत. ते छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू लागतात. याने नातं नष्ट होतं.
खराब भाषा
अनेक महिला आणि पुरूष आपल्या पार्टनरसोबत भांडण करताना काही अपमानजनक आणि कठोर शब्दांचा किंवा भाषेचा वापर करतात. याचा तुमच्या नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. दोघेही रागाच्या भरात हे शब्द वापरतात पण याची जाणीव त्यांना त्यावेळी होत नाही. पण या भाषेमुळे नातं दुरावलेलं असतं.