TECH : आता वायरलेस चार्जरने करा स्मार्टफोन चार्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:50 IST2017-06-10T12:20:21+5:302017-06-10T17:50:21+5:30
स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता एका कंपनीने वायरलेस पद्धतीने चार्जिंग करणारे चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर लॉन्च केले आहे.
.jpg)
TECH : आता वायरलेस चार्जरने करा स्मार्टफोन चार्ज !
स मार्टफोनचा वाढता वापर पाहता एका कंपनीने वायरलेस पद्धतीने चार्जिंग करणारे चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे चार्जर लॉन्च केले आहे. काही निवडक महागड्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. मात्र हे तंत्रज्ञान अजून अपेक्षित विकसित झालेले नाही. या पार्श्वभूमिवर मोफी कंपनीचे चार्ज फार्स पॉवरस्टेशन मिनी या चार्जरची निर्मिती केली आहे.
या चार्जरला ३ हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी चार्ज केल्यानंतर चुंबकीय लहरींच्या मदतीने उर्जेचे वहन करून याला अटॅच केलेल्या स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करता येते. शिवाय स्मार्टफोनची बॅटरी नेमकी किती प्रमाणात चार्ज झाली? हे समजण्यासाठी यात चार एलईडींनी युक्त असणारे इंडिकेटर प्रदान करण्यात आले आहे.
चार्ज फोर्स पॉवरस्टेशन मिनी हे मॉडेल एखाद्या स्मार्टफोनच्या बॅटरीसारखे असून ते कोणत्याही हँडसेटच्या मागील बाजूस सहजपणे अटॅच करता येते. यानंतर कोणत्याही वायरची मदत घेतल्याविना संबंधीत हँडसेटची बॅटरी वायरलेस पध्दतीने चार्ज होण्यास प्रारंभ होतो. यासोबत प्रायॉरिटी प्लस या मायक्रो-युएसबीची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच्या मदतीने संबंधीत उपकरणासह स्मार्टफोनलाही चार्ज करता येते. सॅमसंग गॅलेक्सी एस ७, एस ६ एज, एस ८ आणि एस८ प्लस तसेच अॅपल आयफोन ६/६ प्लस, आयफोन ७/७ प्लस आदी मॉडेल्सच्या बॅटरीला याच्या मदतीने चार्ज करता येते. हे उपकरण ४९ डॉलर्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
Also Read : TECH : फोन चार्ज करताना ‘या’ 7 गोष्टी फॉलो करा, अन्यथा होइल नुकसान !
TECH : अवघ्या ३० मिनिटात करा स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण चार्ज
See Video :