शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिता सेन : २३ वर्षापूर्वी मिस युनिव्हर्स झाली ..आणि त्यानंतर..

By admin | Updated: May 20, 2017 16:48 IST

२१ मे १९९४: सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली; त्यानंतर बदललेलं जग!

- अनन्या भारद्वाजसुश्मिता सेन. सिर्फ नामही काफी है, असं जगणं, अशी तिची जगण्याची रीत. ग्लॅमरच्या दुनियेत तर सुश्मितानं नाव कमावलंच. पण बदलत्या भारतीय जगण्यात बंडखोरीचे काही निर्णय घेत मनाप्रमाणं जगण्याचं धाडसही केलं. २१ मे २०१४ रोजी ती मिस युनिव्हर्स झाली. पहिली भारतीय तरुणी, मिस युनिव्हर्स बनलेली, म्हणजे सुश्मिता सेन. त्याला उद्या २३ वर्षे होतील.आज ही बातमी आॅनलाइन वाचणारे, सोशल मीडीया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर जगणं शेअर करणारे अनेकजण तर त्या काळी जन्मालाही आले नव्हते. जागतिकीकरणाची दारं नुकती किलकिलं केलेली भारतीय अर्थव्यस्था,नव्यानं आलेला रंगीत टिव्ही, बदलत्या मार्केटिंगचं नवं जग आणि बदलतं राजकारण आणि समाजकारण असा विलक्षण गुंतागुतीचा तो काळ होता. जुनं सुटू पाहत होतं, नवं वेगानं अंगावर येत होतं. आणि त्या काळात १९९४ मध्ये दोन भारतीय मुलींनी जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवला, भारताची एक वेगळी ओळख सांगितली. सुश्मिता सेन, आणि ऐश्वर्या राय. सुश्मिता मिस वर्ल्ड बनली आणि त्यानंतर स्वप्न, महत्वाकांक्षा, बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा एक नया दौरच सुरू झाला.

मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिता सिनेमा आणि बॉलिवूडकडे वळली. पण तिथं ती ना फार रमली ना फार यशस्वी झाली. मात्र तरीही ती चर्चेत होती. ती तिच्या स्वतंत्र लाइफस्टाईलमुळे. तिनं जगण्याची जी नवीन वाट पत्करली त्यामुळे. वयाच्या २५व्या वर्षी सुश्मितानं एक मुलगी दत्तक घेतली. रीनी तिचं नाव. लग्न न करता, एकट्या बाईनं असं मुल दत्तक घेणं हे त्याकाळी फार बंडखोर मानलं गेलं. थेट कोर्टात गेली केस. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं सुश्मिताच्या बाजूनं निकाल देत आई म्हणून तिला रीनीची लिगल कस्टडी दिली. त्या लेकीचं पालनपोेषण तिनं मोठ्या जबाबदारीनं केलं. पुढं २०१० मध्ये तिनं तिन महिन्यांची अजून एक मुलगी दत्तक घेतली. आलिसे तिचं नाव. लग्न न करता दोन मुलींचं मातृत्व तिनं स्वीकारलं आणि आईपणाचं एक वत्सल रुपही जगासमोर ठेवलं.हे सारं करताना तिनं व्यवसाय सांभाळते. ती बोलते उत्तम. जगाची पर्वा न करता जगते. अधूनमधून सिनेमात काम करते. आणि जगभर प्रवासाची आपली आवडही जोपासते.२३ वर्षांपूर्वी एका टीनएनजर मुलीनं सर्वोत्कृष्ट होण्याचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचं, महत्वाकांक्षेचं एक स्वप्न भारतीय तरुण मुलामुलींना दिलं होतं. आता त्या स्वप्नांच्या पुढचा प्रवास या देशात सुरु झालेला दिसतो.त्याच प्रवासात आज सुश्मितानंही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर २३ वर्षे पुर्तीच्या सेलिब्रेशनचे काही क्षण आणि काही आठवणीही शेअर केल्या आहेत. त्या आठवणीही काळाचा हा प्रवास सांगतात..सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली तो काळ आणि तो क्षण पुन्हा अनुभवायचा असेल तर हा व्हीडीओ पहा..