सुश्मिता सेन : २३ वर्षापूर्वी मिस युनिव्हर्स झाली ..आणि त्यानंतर..
By Admin | Updated: May 20, 2017 16:48 IST2017-05-20T16:35:15+5:302017-05-20T16:48:08+5:30
२१ मे १९९४: सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली; त्यानंतर बदललेलं जग!

सुश्मिता सेन : २३ वर्षापूर्वी मिस युनिव्हर्स झाली ..आणि त्यानंतर..
- अनन्या भारद्वाज
सुश्मिता सेन. सिर्फ नामही काफी है, असं जगणं, अशी तिची जगण्याची रीत. ग्लॅमरच्या दुनियेत तर सुश्मितानं नाव कमावलंच. पण बदलत्या भारतीय जगण्यात बंडखोरीचे काही निर्णय घेत मनाप्रमाणं जगण्याचं धाडसही केलं. २१ मे २०१४ रोजी ती मिस युनिव्हर्स झाली. पहिली भारतीय तरुणी, मिस युनिव्हर्स बनलेली, म्हणजे सुश्मिता सेन. त्याला उद्या २३ वर्षे होतील.आज ही बातमी आॅनलाइन वाचणारे, सोशल मीडीया, व्हॉट्सअॅप, फेसबुकवर जगणं शेअर करणारे अनेकजण तर त्या काळी जन्मालाही आले नव्हते. जागतिकीकरणाची दारं नुकती किलकिलं केलेली भारतीय अर्थव्यस्था,नव्यानं आलेला रंगीत टिव्ही, बदलत्या मार्केटिंगचं नवं जग आणि बदलतं राजकारण आणि समाजकारण असा विलक्षण गुंतागुतीचा तो काळ होता. जुनं सुटू पाहत होतं, नवं वेगानं अंगावर येत होतं. आणि त्या काळात १९९४ मध्ये दोन भारतीय मुलींनी जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवला, भारताची एक वेगळी ओळख सांगितली. सुश्मिता सेन, आणि ऐश्वर्या राय. सुश्मिता मिस वर्ल्ड बनली आणि त्यानंतर स्वप्न, महत्वाकांक्षा, बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा एक नया दौरच सुरू झाला.
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिता सिनेमा आणि बॉलिवूडकडे वळली. पण तिथं ती ना फार रमली ना फार यशस्वी झाली. मात्र तरीही ती चर्चेत होती. ती तिच्या स्वतंत्र लाइफस्टाईलमुळे. तिनं जगण्याची जी नवीन वाट पत्करली त्यामुळे. वयाच्या २५व्या वर्षी सुश्मितानं एक मुलगी दत्तक घेतली. रीनी तिचं नाव. लग्न न करता, एकट्या बाईनं असं मुल दत्तक घेणं हे त्याकाळी फार बंडखोर मानलं गेलं. थेट कोर्टात गेली केस. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं सुश्मिताच्या बाजूनं निकाल देत आई म्हणून तिला रीनीची लिगल कस्टडी दिली. त्या लेकीचं पालनपोेषण तिनं मोठ्या जबाबदारीनं केलं. पुढं २०१० मध्ये तिनं तिन महिन्यांची अजून एक मुलगी दत्तक घेतली. आलिसे तिचं नाव. लग्न न करता दोन मुलींचं मातृत्व तिनं स्वीकारलं आणि आईपणाचं एक वत्सल रुपही जगासमोर ठेवलं.
हे सारं करताना तिनं व्यवसाय सांभाळते. ती बोलते उत्तम. जगाची पर्वा न करता जगते. अधूनमधून सिनेमात काम करते. आणि जगभर प्रवासाची आपली आवडही जोपासते.
२३ वर्षांपूर्वी एका टीनएनजर मुलीनं सर्वोत्कृष्ट होण्याचं, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचं, महत्वाकांक्षेचं एक स्वप्न भारतीय तरुण मुलामुलींना दिलं होतं. आता त्या स्वप्नांच्या पुढचा प्रवास या देशात सुरु झालेला दिसतो.
त्याच प्रवासात आज सुश्मितानंही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर २३ वर्षे पुर्तीच्या सेलिब्रेशनचे काही क्षण आणि काही आठवणीही शेअर केल्या आहेत. त्या आठवणीही काळाचा हा प्रवास सांगतात..
सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली तो काळ आणि तो क्षण पुन्हा अनुभवायचा असेल तर हा व्हीडीओ पहा..