चार मुलांचा सांभाळ करणारी सुपरमॉम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 07:04 IST2016-03-16T14:04:03+5:302016-03-16T07:04:03+5:30
एकाचवेळी चार लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आली तर

चार मुलांचा सांभाळ करणारी सुपरमॉम
मात्र कॅनडाच्या सुपरमॉमने हे करून दाखवले आहे. कॅनडाच्या डॅन गिब्सनने दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केलाय. यात चार मस्तीखोर बाळांना कपडे घालताना तिची कशी दमछाक होतेय हे दाखवलेय. गेल्या सहा दिवसांत सहा कोटाहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.
तिला मागील वर्षी चार मुले झाली होती. तेव्हा तेव्हा या आईने आपण अतिशय भाग्यवान आहोत असे सांगितले होते. आता या मुलांचा सांभाळ करणे कठीण बाब असल्याचेही ती म्हणाली होती. मात्र आता या मुले मोठी झाली असून चांगलीच मस्तीखोर झाली आहे. यामुळे तिला त्यांचा सांभाळ करणे थोडे कठीण वाटत असले तरी त्यांचा चांगला सांभाळ करताना दिसते.
">http://