स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:34 IST2017-08-09T18:26:02+5:302017-08-09T18:34:11+5:30

मुलांना वळण लावणं अगदीच सोपं, पण तितकंच अवघडही..

stay cool, while disciplinig children | स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

स्वत: ‘शिस्तीत’ राहाल, तरच मुलांनाही लागेल ‘वळण’..

ठळक मुद्देपालकांनी अगोदर स्वत:ला शिस्त लावण्याची गरज.अनुकरणातून आणि प्रेमानंच मुलांना शिस्त लागू शकते.योग्य तीच गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे.

- मयूर पठाडे

कसं लावायचं मुलांना वळण? कशी लावायची त्यांना शिस्त?.. घराघरातला हा प्रश्न आणि घराघरातले पालक त्यामुळे वैतागलेले. सुजाण पालकत्त्वाचे धडे तसे साºयांनीच गिरवलेले. तरीही त्यांना प्रश्न पडतो.. अरे, एवढी काळजी आम्ही घेतोय, तरी आपलं मूल असं का? का नाही लागत त्याला वळत..
कधीतरी मग पालकांचाही संयम सुटतो आणि मग ते ‘वळणावर’ येतात. सुरुवात होते ते ती रागावण्यापासून आणि मग हळूहळू मुलांची पाठ शेकायला सुरुवात होते.
त्यातली पुन्हा गंमतीची गोष्ट अशी, कोणत्याही पालकाला आपल्या मुलाला मारायला, रागवायला आवडत नाही, पण त्यापासून त्यांना राहावतही नाही. हा संयम तुटतोच आणि मुलांनी ऐकलं नाही, बेशिस्त वर्तन केलं की त्यांना मार बसायला लागतो..
मुलांना मारल्यानंतर पालकांनाही खूप खूप वाईट वाटतं. काही पालक तर स्वत:लाच शिक्षा करून घेतात, पण तरीही अपेक्षित बदल दिसत नाही, तो नाहीच.
मुलांना वळण, शिस्त लावायची तरी कशी?
१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिस्त सुरू झाली पाहिजे ती स्वत:पासूनच. आपण स्वत:च जर शिस्त पाळली, सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी केल्या तर मुलांनाही आपोआपच ते वळण लागेल.
२- आपणच जर पसारा करीत असू, वस्तू, आपले कपडे, जेवणाचं ताट, वर्तमानपत्र, अंथरुण, पांघरुण.. कुठेही फेकत असू, आरडाओरडा करीत असू, तर नकळतपणे मुलांच्या मनावरही तेच बिंबत जातं.
३- आपल्या बोलण्याचा टोन बघा. तो कधीही वरच्या सुरातला, तिरकस नको.
४- मुलांशी बोलत असताना कोणते शब्द आपण वापरतो, रागाच्या भरात आपण काहीही अद्वातद्वा त्यांना बोलतो का, याकडेही लक्ष द्या.
५- कोणत्याही कारणानं मूल जेव्हा तुमच्याशी बोलतं, तुमच्याकडे येतं, त्यावेळी त्याला योग्य तोच सल्ला मिळाला पाहिजे. काहीतरी थातूरमातूर सांगून त्याची बोळवण करायला नको. आपल्याला ती गोष्ट माहीत नसेल, तर नंतर, अभ्यास करून, विचारुन सांगा, पण योग्य तीच गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मुलंही मग आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना शॉर्ट कट मारत नाहीत.
६- एक लक्षात घ्या, मारझोड करून, आरडाओरड करून, धाकात ठेवून मुलांना कधीही शिस्त लागत नाही. मुलांना शिस्त लागते ती प्रेमानं आणि अनुकरणातून. ही ‘शिस्त’ आपण स्वत:ला लावली, तर मुलं त्यातून खूप काही शिकतील.

Web Title: stay cool, while disciplinig children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.