पाहा : ए.आर. रहमान आणि विराट कोहलीची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 21:35 IST2016-06-25T16:04:16+5:302016-06-25T21:35:29+5:30

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली खरोखरीच स्टार आहे. आपल्या प्रत्येक अदांनी तो लोकांना वेड लावतो. मग क्रिकेटचे मैदान असो, त्याची स्टाईल असो वा डान्स असो. आता विराट नव्या अवतारात दिसणार आहे.

See: AR Rehman and Virat Kohli's Doubt | पाहा : ए.आर. रहमान आणि विराट कोहलीची जुगलबंदी

पाहा : ए.आर. रहमान आणि विराट कोहलीची जुगलबंदी

म इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली खरोखरीच स्टार आहे. आपल्या प्रत्येक अदांनी तो लोकांना वेड लावतो. मग क्रिकेटचे मैदान असो, त्याची स्टाईल असो वा डान्स असो. आता विराट नव्या अवतारात दिसणार आहे. होय, आॅस्कर विजेता ए. आर. रहमान याच्या धूनवर गातांना आणि नाचतांना तो दिसणार आहे. या डान्स व्हिडिओमध्ये विराटने एखाद्या हिप-हॉप स्टारला लाजवेल असा परफॉर्मन्स दिला आहे. ३५ सेकंदाचा हा व्हिडिओ म्हणजे विराटच्या गाण्याची नुसती एक झलक आहे. हे गाणे त्याने विराटसोबत गायले आहे. कधी रहमानसोबत नाचताना तर कधी त्याच्यासोबत गातानाचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे धूम माजवत आहे. विराटने हे थीम सॉन्ग प्रीमिअर फुटबॉल लीगसाठी तयार केले आहे. विराट याचा बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसीडर आहे. येत्या १५ जुलैला भारतात प्रथमच प्रीमीयर फुटबॉल लीगचे आयोजन होत आहे. हे संपूर्ण गाणे लवकरच रिलीज होणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ बघाच!

Web Title: See: AR Rehman and Virat Kohli's Doubt