शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश ठेवण्याचा 'साइन्टिफिक' फंडा, तुम्हाला माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 14:41 IST

जर तुम्ही पुरूषांना विचारलं तर जास्तीत जास्त पुरूष हेच उत्तर देतील की, पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश करणं अशक्य आहे आणि यासाठी कोणतीही पद्धत नाहीये.

जर तुम्ही पुरूषांना विचारलं तर जास्तीत जास्त पुरूष हेच उत्तर देतील की, पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला खूश करणं अशक्य आहे आणि यासाठी कोणतीही पद्धत नाहीये. पण जर सायन्सचं मानलं तर याचं उत्तर आहे. नुकताच करण्यात आलेला एक रिसर्च याकडे इशारा करतो की, गर्लफ्रेन्ड किंवा पत्नीला खूश करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे empathise म्हणजेच सहानुभूति दर्शवाणे.

कसा केला रिसर्च?

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनकडून करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १५६ हेट्रोसेक्शुअल कपल्सचा अभ्यास केला, जे वेगवेगळ्या इकॉनॉमिक बॅकग्राउंडचे होते. हे कपल्स कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकमेकांसोबत होते. या रिसर्चचा उद्देश हे जाणून घेणं होतं की, महिला आणि पुरूष सहानुभूतिला किती महत्त्व देतात. सर्वच सहभागी लोकांना काही व्हिडीओ दाखवले गेले आणि विचारलं गेलं की, त्यांना कसं वाटलं, त्यांच्या पार्टनरला कसं वाटत होतं आणि त्यांना समजून घेण्यात त्यांचे पार्टनर्स किती मेहनत घेत होते.

पार्टनरने एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले तर चांगलं

या रिसर्चमध्ये महिला आणि पुरूष दोघांचं हेच म्हणनं होतं की, जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना समजून घेण्यासाठी जास्त एफर्ट्स लावतात तेव्हा त्यांना चांगलं वाटतं. या गोष्टीला महिलांनी जास्त महत्त्व दिलं. रिसर्चमध्ये सहभागी महिलांनी रिलेशनशिपमध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन दाखवलं, तर त्यांच्या प्रियकराने किंवा पतीने त्यांना समजून घेण्यात जास्त मेहनत घेतली. अभ्यासकांनुसार, महिला त्यांच्या पार्टनरना सहानुभूति दाखवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याला महत्त्व देतात. कारण हा याचा संकेत आहे की, तुमचा पार्टनर रिलेशनशिपबाबत सतर्क आहे आणि त्यांना इमोशनली जवळीकता जाणवते.  

नातं आनंदी आणि हेल्दी ठेवण्यासाठी सहानुभूति

कोणतंही रिलेशनशिप आनंदी आणि हेल्दी ठेवण्यासाठी तशा तर अनेक गोष्टी असतात, पण त्यात सहानुभूति हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पार्टनरचं म्हणनं ऐकून न घेता किंवा समजून न घेता रिअ‍ॅक्ट करून कोणत्याही निर्णयावर पोहोचल्याने भांडणं होऊ शकतात. अशात पार्टनरला समजून घेणे आणि त्यांना सहानुभूति दाखवणे गरजेचं असतं.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप