शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कसं ओळखाल तुमचा पार्टनर ऑनलाइन अफेअरमध्ये आहे बिझी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:43 IST

Relationship : तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात किंवा जीवनात काय सुरू आहे हे ओळखू शकता. जर एखादी व्यक्ती ऑनलाइन अफेअरमध्ये असे तर त्याची काही लक्षणे दिसतात. जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Relationship : आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक घटना समोर येत असतात. ज्या फारच अजब असतात. कधी कधी तर नात्यांचा गुंता इतका भयंकर असतो यावरही विश्वास बसत नाही. महिला असो वा पुरूष अशा नात्यात अडकले की, त्यांच्या वागण्यात फरक बघायला मिळतो. ज्यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात किंवा जीवनात काय सुरू आहे हे ओळखू शकता. जर एखादी व्यक्ती ऑनलाइन अफेअरमध्ये असे तर त्याची काही लक्षणे दिसतात. जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

झोपण्याची पद्धत

सामान्यपणे जे लोक ऑनलाइन अ‍ॅक्टिविटीमध्ये गुंतलेले असतात त्यातील जास्तीत जास्त लोक रात्री उशीरापर्यंत जागी असतात. जर त्यांचं काही सुरू असेल तर असे लोक हे रात्रभर ऑनलाइन टाईमपास करत असतात. ऑनलाइन कुणाशी चॅटींग करत असताना त्या व्यक्तीचं कशात काही लक्ष राहत नाही. ते त्यांच्या विश्वात हरवलेले असतात.

फोन-लॅपटॉपला हात न लावू देणे

जर तुमच्या पार्टनरचं ऑनलाइन अफेअर सुरू असेल तर ती व्यक्ती त्यांचा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप सर्वांपासून दूर ठेवतात. त्याला कुणालाही हात लावू देत नाहीत. ते कधीही फोनवर एखाद्या कोपऱ्यात बघायला मिळतात. इतकेच काय तर ते फोनचा पासवर्डही बदलतात. अशात जर तुम्ही त्यांचा फोन चेक केला तर त्यांना राग येतो. 

घरात दुर्लक्ष

तुमची फसवणूक करणारा तुमचा पार्टनर जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन राहतो तेव्हा तेव्हा ते घरातील कामांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या सोडून ते भलतीकडेच लक्ष देत आहेत. 

गोष्टी लपवणे

जे पार्टनर फसवणूक करतात ते सतत काहीतरी लपवत असतात. ते त्यांचे क्रेडिट कार्ड बिल्स, डेटिंग साइट्स किंवा अ‍ॅडल्ट साइट्स लपवण्याचा प्रयत्न करतात. ते गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात. 

व्यवहारात बदल

जर त्यांचं कुठे काही सुरू असेल तर त्यांच्या वागण्यात फार बदल बघायला मिळतो. जर तो शांत असेल तर आनंदी राहील किंवा अचानक फार उत्तेजित होईल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप