शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'ही' लक्षणे दिसली तर समजा आली ब्रेकअप करण्याची वेळ, उशीर झाला तर पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 16:02 IST

Relationship Tips : जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे.

Relationship Tips : सुरूवातीला चांगलं वाटणारं प्रेमाच नातं नंतर वेगळ्याच वळणावर जातं. एकमेकांना माहीत नसलेल्या गोष्टी समोर येऊ लागतात. तेव्हा नातं किचकट होतं. वाद वाढले की, पार्टनर सोबत असूनही तुम्हाला एकटं वाटू लागतं. त्या नात्यात मग काही अर्थ उरलेला नसतो. अशात वेळीच जर त्यावर काही विचार केला नाही, तर दोघांचही जगणं कठीण होऊन बसतं. चला जाणून घेऊया अशीच काही लक्षण ज्यावरुन तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहीलं नाही हे कळू शकतं.

चिडचिडपणा वाढणे

जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असेही असू शकते की, त्याचा/तिचा मूड ठिक नसेल, पण अशा गोष्टी जर पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा नात्याला किती पुढे घेऊन जायचं याचा विचार करायला हवा.

स्वाभिमान न जपणे

कोणत्याही नात्याप्रमाणे प्रेमाच्या नात्यातही ऐकमेकांचा सन्मान करणं महत्वाचं असतं. दोघांचही महत्व सारखं असतं. तुम्ही कोणत्या ना कोणत्या रुपात ऐकमेकांना मदतच करत असता. पण जर तो किंवा ती तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्हाला वेळीच या नात्याबद्दल विचार करणे फायद्याचं ठरेल.

नात्यात नाटकीपणा 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा तुम्हाला माहीत आहे की, सगळं काही ठिक आहे पण काही गोष्टी जबरदस्तीने मान्य करुन तुम्ही आनंदी असल्याचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहात, तर वेळीच याचा विचार करा. खोटं आणि दिखावा असलेलं नातं फार काळ टिकत नाही. 

ऐकमेकांना टाळणं

जर तुम्ही विचार करता की, उगाच विषय वाढेल किंवा त्याचा/तिचा मूड ठिक नसल्याने त्याच्या/तिच्याकडे जाण्याची भीती वाटत असेल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऐकमेकांना टाळत असाल तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं. 

केवळ आठवणी

जेव्हा तुम्ही विचार करता की, आधी तुम्ही दोघे किती आनंदी, सकारात्मक, उत्साही आणि मोकळे राहत होते. वेळेनुसार ते नातं पूर्णपणे बदललं आहे. जेव्हा पार्टनर सोबत असतो तरी तुम्ही आनंदी राहत नसाल आणि तुम्हाला काहीही बोलण्याआधी विचार करावा लागत असेल तर हे ते नातं संपल्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप