शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Relationship: असे असतात एकतर्फी प्रेमाचे संकेत, वेळीच द्या लक्ष, अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 2:57 PM

Relationship Tips: असे खूप लोक आहेत जे आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतात. मात्र त्यांना त्याच्या बदल्यात तेवढं प्रेम मिळत नाही ज्याचे ते हक्कदार असतात. आज आपण जाणून घेऊयात की तुमचं नातं एकतर्फी तर नाही ना, तसेच एकतर्फी रिलेशनशिपचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याविषयी.

नवी दिल्ली - काही लोकांना रिलेशन मॅनेज करणे खूप कठीण जाते. नात्यामध्ये बॅलन्सिंगची खूप गरज असते. आधीच्या काळी नाती खूप दीर्घकाळासाठी चालत असत, कारण तेव्हा लोकांना नाती मेन्टेंन करणे चांगल्या पद्धतीने जमत असे. मात्र आजच्या काळात नाती सांभाळणे लोकांसाठी खूप कठीण झाले आहे. असे खूप लोक आहेत जे आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतात. मात्र त्यांना त्याच्या बदल्यात तेवढं प्रेम मिळत नाही ज्याचे ते हक्कदार असतात. आज आपण जाणून घेऊयात की तुमचं नातं एकतर्फी तर नाही ना, तसेच एकतर्फी रिलेशनशिपचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याविषयी.

कुठल्याही नात्यामध्ये परस्परांवरील विश्वास, सन्मान आणि एकमेकांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपण आपल्या पार्टनरवर जेवढं प्रेम करतो तेवढंच आपल्या पार्टनरने आपल्यावर करावं अशी अपेक्षा असते. मात्र असं बऱ्याचदा होत नाही. अनेकजण आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात मात्र त्याच्या बदल्यात त्यांना प्रेम मिळत नाही. यालाच एकतर्फी प्रेम म्हटलं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही काही पद्धतींमधून एकतर्फी प्रेमाचा शोध घेऊ शकता.

एकतर्फी प्रयत्न करणे - रिलेशनशिपमध्ये नेहमी कपल्स एक-दुसऱ्याला गिफ्ट्स देतात. सरप्राईज प्लॅन करतात. मात्र जर असं केवळ तुम्हीच तुमच्या पार्टनरसाठी करत असाल तर आणि तो तुमच्यासाठी काहीच करत नसेल तर समजून जा की तो तुमची रिलेशनशिप ही एकतर्फी आहे.प्रायॉरिटी लिस्टमध्ये सामील न करणे - जर तुमचा पार्टनर दुसऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त प्राधान्य देत असेल आणि तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देत असेल तर तर समजून जा की तुम्ही एकरर्फी रिलेशनशिपमध्ये आहात. चूक झाल्यावर माफी न मागणे - प्रत्येक नात्यामध्ये रुसणे आणि समजावणे चालूच असते. मात्र एकतर्फी रिलेशनमध्ये केवळ एकाच व्यक्तीला समजावावे लागते. अनेकदा चूक नसतानाही एकाच व्यक्तीला माफी मागावी लागते.

असे दूर करा एकतर्फी रिलेशनशिपमधील प्रॉब्लेम पार्टनरशी बोला -नेहमी लोक पार्टनरला नाराज होण्याच्या भीतीने काही बोलतच नाही. जर तुम्हाला तुमचं प्रेम एकतर्फी आहे असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने तुनच्या पार्टनरशी बोला. कदाचित तुमचं म्हणणं ऐकल्यावर तो तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने वागू लागेल. कुटुंब, मित्र आणि तज्ज्ञांची मदत घेणे -जर तुम्हाला तुम्ही एकतर्फी रिलेशनशिपमध्ये आहात असे वाटत असेल तर अशा वेळी कुटुंबीय, मित्र आणि तज्ज्ञांची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला खूप मदत मिळेल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपFamilyपरिवार