Relationship : मुलींनो, त्याचा लग्नास नकार कसे ओळखाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 13:43 IST2017-07-13T08:13:59+5:302017-07-13T13:43:59+5:30
अशी काही लक्षणे आहेत, ज्यावरून समजेल की आपले नाते धोक्यात आहे...
.jpg)
Relationship : मुलींनो, त्याचा लग्नास नकार कसे ओळखाल?
जर आपण बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये आहात आणि आपल्या पार्टनरच्या व्यवहारात वेगळाच बदल किंवा असुरक्षितेची जाणीव होत असेल तर हे आपल्या नात्यासाठी धोकादायक ठरु शकते. हा बदल जर सकारात्मक असेल तर ठीक आहे, मात्र यामुळे जर आपणास समस्या निर्माण होत असतील तर थोडे सतर्क व्हायला हवे. बऱ्याच चित्रपटात असे या प्रकारचे रिलेशन दाखविले जातात शिवाय सेलेब्सच्या रियल लाइफमध्येही असे घडत असते. हे सेलेब्स बरीच वर्ष रिलेशनमध्ये राहून अचानक वेगळे होतात.
खाली काही लक्षणे दिली आहेत, ज्यावरुन आपणास समजू शकेल की, आपले नाते धोक्यात आहे.
* भविष्यातील योजनांमध्ये नसतो उल्लेख
जेव्हा तो आपल्या भविष्यातील काही विशेष योजनांबद्दल चर्चा करीत असेल आणि त्यात आपला उल्लेख नसेल तर समजावे की तो आपल्याशी भविष्यात नाते ठेऊ इच्छित नाही. जर तो आपल्याशी आपल्या मुलांच्या बाबतीतही चर्चा करत नसेल तर त्याची आपल्याशी लग्न करण्याची इच्छा नाही, असे समजावे.
* संकटसमयी मदत न करणे
जर एखाद्या वेळी आपण काही समस्यात असाल आणि त्याला कळवूनही तो आपल्याला मदत करण्यास स्पष्ट नकार देत असेल किंवा काही कारणे दाखवून लांब पळत असेल समजावे की, त्याला आपल्यात काही आवड नाही.
* आपला सल्ला न घेणे
बहुतेक मुले आपल्या गर्लफ्रेंड्सचा सल्ला आवर्जून घेतात, मात्र तो जर आपल्या ऐवजी त्याच्या अन्य मित्रांचा सल्ला घेत असल्याचे आपल्या निदर्शनास आले तर समजावे की, आपले नाते संकटात आहे.
* त्याच्या फीमेल फ्रेंड्सना न भेटवणे
मुलांना बऱ्याच फीमेल फ्रेंड्स असू शकतात. जर आपणास त्याच्या एखाद्या मैत्रीणीबाबत शंका असेल आणि आपल्या सांगण्यावरूनही तो तिची आपल्याशी भेट होऊ देत नसेल तर समजावे की काही तरी गडबड आहे. याशिवाय तो जर आपल्या एक्स गर्लफ्रेंड्सशी अजूनही बोलत असेल तरीही आपल्या नात्यासाठी ते घातक आहे.
* आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष
जर त्याला तुमच्या परिवारातील एखाद्या सदस्याची बर्थडे पार्टी, लग्न वाढदिवसाची पार्टी किंवा कुणाचे आजारपणाविषयी काळजी नसेल किंवा त्याचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर समजावे की तो तुमच्या परिवाराला आपला परिवार म्हणून स्वीकारु शकत नाही.
Also Read : Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?
: Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !