Relation : आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 15:25 IST2017-08-02T09:55:17+5:302017-08-02T15:25:17+5:30
जसजसे दिवस वाढत जातात तसे नात्यातील दूरावा वाढत जातो. आपल्या नात्यातही असे घडू नये म्हणून काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...
.jpg)
Relation : आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!
नात्याची सुरुवात ही गोड आणि आकर्षक पद्धतीने होत असते. सुरुवातीचे काही दिवस नात्यातील गोडवा टिकून राहतो, मात्र जसजसे दिवस वाढत जातात तसे नात्यातील दूरावा वाढत जातो. काही काळाच्या सहवासानंतर जोडीदाराचे अनेक दोष लक्षात यायला लागतात आणि आपला पार्टनर आपणास नकोसा वाटू लागतो. अगदी लहान-लहान गोष्टींमुळे वाद निर्माण होऊन ते इतके विकोपाला जातात की त्याचा शेवट नाते तुटण्यात होतो.
आपल्या नात्यातही असे घडू नये म्हणून काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे...
* संवाद वाढवा
बऱ्यादचा मुली काही गोष्टी मनातल्या मनात ठेवतात, म्हणजे बोलून दाखवत नाहीत. यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे, ते कळत नाही. त्यामुळे वाद अधिक विकोपाला जातात आणि नात्यात दूरावा येतो. असे होऊ नये म्हणून एकमेकांमधील संवाद वाढविणे आवश्यक आहे. संवाद वाढल्याने एकमेकांच्या मनात काय ते कळेल आणि वाद संपुष्टात येईल.
* इतरांशी तुलना नको
आपल्या जोडीदाराच्या काही निगेटिव्ह गोष्टी माहित झाल्यानंतर बऱ्याच मुली त्याच्या समोर इतरांशी जवळीक साधायचा प्रयत्न करुन त्याची तुलना करतात. मुलींची ही सवय मुलांना मुळीच आवडत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा होणे साहजिकच आहे. असे न करता त्याचे दोष एकांतात त्याच्या लक्षात आणून द्या. असे केल्याने त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल आणि नाते टिकून राहील.
* विनाकारणची भांडणे टाळा
बऱ्याचदा मुली अगदी शुल्लक कारणांनी आपल्या पार्टनरशी भांडतात. सततच्या भांडणांमुळे मुले कंटाळतात. त्यांचा नात्यातील रस कमी होतो आणि नात्यात दूरावा निर्माण होतो. विनाकारणची भांडणे टाळल्यास नात्यात प्रेम टिकून राहते.
* जोडीदाराला दुर्लक्ष करणे टाळा
आपला जोडीदार आपल्याशी गप्पा मारतोय, चर्चा करतोय हे समजूनही बऱ्याच मुली आपल्या जोडीदाराकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. त्याच्या कोणत्याही गोष्टींमध्ये रस नाही असे दर्शवितात. अशामुळे नात्यात ताण निर्माण होतो आणि नाते तुटू शकते. असे होऊ नये म्हणून तो काय सांगतोय याकडे लक्ष द्या आणि त्याला समजून घ्या.
* वेळोवेळी काळजी घ्या
ज्याप्रमाणे तो तुमची छोट्या-छोट्या गोष्टीत काळजी घेतो, त्याप्रमाणे तुम्हीही त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी त्याची माफक अपेक्षा असते. परंतु तुम्ही जर स्वत:च्याच विश्वात गुंग असाल व त्याच्याकडे तुमचे दुर्लक्ष होत असेल तर नात्यात दुरावा येणे स्वाभाविक आहे.
Aslo Read : Relation : चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!
: Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?