Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 18:45 IST2017-08-01T13:15:07+5:302017-08-01T18:45:07+5:30

आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही ते ओळखता येईल.

Relation: Whether the partner is honest, how will you recognize? | Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?

Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?

त्यांमध्ये शुल्लक कारणांनी दुरावा निर्माण होण्याची उदाहरणे भरपूर आहेत. नात्याच्या सुरुवातीला एकमेकांविषयी भरपूर प्रेम असते, मात्र कालांतराने हेच प्रेम विश्वासघातात बदलते. बहुधा नात्यात कडवटपणा आला की पुरूष दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित व्हायला लागतात. तुम्हाला विश्वासही होणार नाही की तुमच्या जोडीदाराचे दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत. जेव्हा तुमच्या लक्षात ही गोष्ट येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल.
आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला पार्टनर आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही ते ओळखता येईल. 

* बहुधा पुरूष लांब काळाच्या नात्यानंतर स्वत:कडे लक्ष द्यायला विसरतात. त्यांच्या गुडलूकची जबाबदारी तुमची बनते. परंतु अचानक पुरूष वारंवार स्वत:ला आरशात न्याहाळत असतील, आपल्या स्टाईलकडे लक्ष देत असतील तर ही धोक्याची घंटा ठरू शकते.

* जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या पतीच्या वागण्यात फरक पडला आहे तर त्यांची बाहेर भानगड असू शकते. तुमच्यावर लवकर चिडणे, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाद घालणे अशाप्रकारच्या गोष्टी घडत असतील तर तुमच्या नवºयाचे बाहेर संबंध असण्याची शक्यता आहे. 

* तुमचा जोडीदार तुमच्यासोबत कमी वेळ घालवत असेल, तुमच्यासोबत बोलणे टाळत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवे.

* तुमच्यासोबत असतानाही तो नेहमी फोनवर राहत असेल, कामाची बोलणी सुरू आहेत असे म्हणून आपला संवाद लपवत असेल, त्याचा फोन तपासून पाहा. 

* तुम्हाला असे जाणवत असेल की, तुमच्यामधील भांडणे वाढली आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा जोडीदार तुमच्यावर चिडत असेल तर त्याच्या आयुष्यात दुसरे कोणी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  

Also Read : ​Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

Web Title: Relation: Whether the partner is honest, how will you recognize?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.