Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:00 IST2017-07-27T10:30:19+5:302017-07-27T16:00:19+5:30

नात्याला दिर्घकाळापर्यंत टिकवायचे असेल तर पार्टनरशी बोलताना कदापीही काही शब्दांचा वापर करु नये. जाणून घेऊया त्या शब्दांच्या बाबतीत...

Relation: Do not use the word 'these' by mistake, otherwise ...! | Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!

Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!

ुतांश मुले जास्त स्मार्ट बनण्याच्या प्रयत्नात आपल्या पार्टनरला जास्तच काही बोलून जातात. जर आपणास आपल्या नात्याची जराशीही काळजी असेल आणि नात्याला दिर्घकाळापर्यंत टिकवायचे असेल तर पार्टनरशी बोलताना कदापीही काही शब्दांचा वापर करु नये. आज आम्ही आपणास अशाच काही शब्दांच्या बाबतीत सांगत आहोत जे शब्द कधीही आपली गर्लफ्रेंड असो की पत्नी यांना कधीही बोलू नयेत.  
जाणून घेऊया त्या शब्दांच्या बाबतीत...

* जेवणाच्या बाबतीत कधीही तुलना नको 
जर आपण गर्लफ्रेंड किंवा पत्नीसोबत बाहेर डिनर किंवा डेटवर गेले असाल तर त्यावेळी कधीही खाण्याची तुलना करु नका. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त खात आहे, असे तिला काही बोलू नका. अन्यथा याचा तिला राग येऊन नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो.  

* दुसऱ्या मुलीची प्रशंसा टाळा 
नेहमी आपल्या पार्टनरची प्रशंसा करा. तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलीशी प्रशंसा तिला अजिबात आवडत नाही. यामुळे ती नाराज होऊन तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.  

* तिची तुलना कुणाशी नको
तु अगदी तुझ्या आईसारखीच गोष्टी करते, असे शब्दप्रयोग कधीही करु नका. आपल्या पार्टनरची तुलना तिची आई, बहीण किंवा तिच्या मैत्रिणीशी कधीही करु नये. यामुळे तिचा आत्मसन्मान दुखावला जातो आणि तिला राग येतो. प्रत्येकाची आपली वेगळी ओळख असते.  

* एक्स गर्लफ्रेंडची बरोबरी नको  
अशी चुक तर कदापीही करु नये. आपल्या एक्स गर्लफ्रें डची प्रशंसा आपल्या नात्यात मोठा दुरावा निर्माण करु शकते. यामुळे कधीही आपल्या एक्स गर्लफे्रंडची बरोबरी तिच्याशी करु नका. 

* आय लव्ह यू
जर आपण मनापासून बोलत नसाल तर हे तीन शब्द कदापी बोलू नका. आपण कधी मनापासून आय लव्ह यू बोलत आहोत आणि कधी फक्त भांडणापासून वाचण्यासाठी बोलत आहोत हे मुली अगदी सहजतेने ओळखतात. 

Also Read : ​Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !
                   : ​Relationship : ​पार्टनरच्या ‘या’ गोष्टी आपणास माहित असाव्याच !

Web Title: Relation: Do not use the word 'these' by mistake, otherwise ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.