Relation : ​पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी फिरताना "हे" मुळीच करू नका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 17:00 IST2017-07-21T11:30:11+5:302017-07-21T17:00:11+5:30

काहीजण एवढे धुंद होतात की, सार्वजनिक ठिकाणी फिरताना सर्व भानच विसरतात.

Relation: Do not do this at all! | Relation : ​पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी फिरताना "हे" मुळीच करू नका !

Relation : ​पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी फिरताना "हे" मुळीच करू नका !

ची तरुणाई म्हणजे चित्रपटांचे प्रतिबिंबच समजावे. चित्रपटात अभिनेत्रीसोबत हातात हात घालून फिरणारा हिरो पाहिला की, इकडे आपल्या पार्टनरसोबत तशाच प्रकारे फिरण्यासाठी तरुणाई झाली सज्ज. पार्टनरसोबत फिरणे तसे अगदी आनंददायी गोष्ट असते. मात्र काहीजण तर चित्रपटांचे अनुकरण करुन एवढे धुंद होतात की, सार्वजनिक ठिकाणी फिरताना सर्व भानच विसरतात. 

सार्वजनिक ठिकाणी फिरताना काय काळजी घ्याल ?

* बऱ्याचदा आपल्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी आपण पार्टनरचा हातात हात धरतो, चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करुन आपल्या प्रेमाचा दिखावा अजिबात करु नये. 

* काहीजण बाहेर फिरायला जात आहेत म्हणून मॅचिंग कपडे परिधान करतात. फॅशन शो किंवा स्पर्धेसाठी सारखे कपडे घालणे ठीक आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी एकसारखे कपडे घालणे विचित्र वाटते. 

* बरेचजण आपल्या व्यक्तिगत नात्याचे प्रदर्शन करतात. जोडीदार तुमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असला, तरी तुमचे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे.  प्रत्येक वेळी इतरांसोबत बोलताना आपल्या नात्याविषयी बोलणे टाळावे. 

* काहीजण तर बालिशपणाची हद्दच करतात. सार्वजनिक ठिकाणी आपल्या पार्टनरला लाडाच्या नावाने कधीही हाक मारु नका. आपणास जरी असे वागणे लडिवाळपणाचे वाटत असले, तरी इतरांना ते बालिशपणाचे वाटते. 

* बरेचजण अगदी लहान मुलांसारखे बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी असे बोलणे अती केल्यासारखे वाटेल. 

* आपण जर गु्रपने कुठे फिरायला गेले असाल तर इतरांशी संवाद साधण्याऐवजी फक्त एकमेकांशीच गप्पा करण्यात गुंग राहू नका. तुमच्या अशा वागण्याने गु्रपमध्ये वेगळीच चर्चा सुरु होते.  

* कोणीही माहिती विचारली नसताना, किंवा सांगण्याची गरज नसताना जर तुम्ही आपल्या खासगी आयुष्यविषयी सगळ्यांसमोर बोलत आहात तर ते मुळीच योग्य नाही.  

Web Title: Relation: Do not do this at all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.