Relationship: श्रीमंत महिलेचा बॉयफ्रेंड, त्याला 11 लाख रुपये पगार; लोकांमध्ये कोण कोणाला सोडेल याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:29 PM2021-10-13T15:29:48+5:302021-10-13T15:30:45+5:30

Age Gap In Relationship: दोघांच्या या रिलेशनशिपमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. ज्युली नावाची ही महिला आहे. तिचे TikTok वर अकाऊंट आहे. त्यावर तिने आपल्या बॉयफ्रेंडबाबत माहिती दिली आहे.

reach women have 15 years younger boyfriend; she gave him salary of 11 lakhs per month | Relationship: श्रीमंत महिलेचा बॉयफ्रेंड, त्याला 11 लाख रुपये पगार; लोकांमध्ये कोण कोणाला सोडेल याची चर्चा

Relationship: श्रीमंत महिलेचा बॉयफ्रेंड, त्याला 11 लाख रुपये पगार; लोकांमध्ये कोण कोणाला सोडेल याची चर्चा

Next

एका 44 वर्षीय महिलेला तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंड (Boyfriend)  आहे. धक्कादायक म्हणजे ती त्याला दर महिन्य़ाला एक पगारही (Salary) देते. महिलेने सोशल मीडियावर या तिच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. 

ज्युली नावाची ही महिला आहे. तिचे TikTok वर @julie.withthebooty हे अकाऊंट आहे. त्यावर तिने आपल्या बॉयफ्रेंडबाबत माहिती दिली आहे. ज्युलीचे वय 44 वर्षे आहे. तर तिचा बॉयफ्रेंड हा 29 वर्षांचा आहे. त्याच्याकडूव काहीही काम करून घेण्यासाठी ती त्याला दर महिन्याला 11 लाख रुपये देत असल्याचे सांगते. 

ज्युली तिच्या बॉयफ्रेंडकडून जेवन बनविण्यासह पूलची साफसफाई, घरातील कामे करवून घेते. यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंडला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून देते, त्याच्या मागण्या पुरविते. एका महिन्यात तिने त्याच्यावर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. द सन युकेने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेव्हा लोकांनी तिला विचारले की बॉयफ्रेंडला या बदल्यात किती पैसे देते. तेव्हा तिने एका महिन्याचे 11 लाख रुपये. एवढे करूनही तो या महिन्यात स्विमिंगपूलची स्वच्छता करण्यास विसरला, असे ती म्हणाली. पगाराच्या बदल्यात तिला जे वाटेल ती कामे ती त्याच्याकडून करवून घेते. 

लोकांचे टोमणे...
दोघांच्या या रिलेशनशिपमध्ये वयाचे मोठे अंतर (Age Gap In Relationship) आहे. यामुळे अनेकदा तिच्या ओळखीचे, अनोळखी लोक तिला टोमणे देखील मारतात. परंतू ती त्याकडे लक्ष देत नाही. लवकरच तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून दुसऱ्या तरुणीकडे जाईल, असे सांगतात. यावर ज्युली म्हणते, मी त्याला सोडेन याची भीती त्याला वाटायला हवी. रिपोर्टनुसार ज्युली एक श्रीमंत महिला आहे. 

Web Title: reach women have 15 years younger boyfriend; she gave him salary of 11 lakhs per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.