पायलटने उद्घोषणा करून दिली ‘गुड न्यूज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:43 IST2016-03-04T11:43:28+5:302016-03-04T04:43:28+5:30

 लिसाने पायलटजवळ एका चिठ्ठीत अशी उद्घोषणा करावी असे लिहून दिले.

Pilot announced 'Good News' | पायलटने उद्घोषणा करून दिली ‘गुड न्यूज’

पायलटने उद्घोषणा करून दिली ‘गुड न्यूज’

ong>विमानात अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली असावी. कारण एका महिलेने आई होणार असल्याची खुशखबर, तिच्या नवºयाला चक्क विमानात प्रवास करताना सर्वांसमोर पायलटद्वारे उद्घोषणा करून दिली.

लॉस वेगास ते फिलाडेल्फिया दरम्यान विमानातून प्रवास करताना, लिसा सॅडिवँक या महिलेने ती गरोदर असल्याचे आपल्या नवºयाला सांगितले. विशेष म्हणजे ही गूड न्यूज तिने विमानात पायलटद्वारे उद्घोषणा करून दिली. लिसाने पायलटजवळ एका चिठ्ठीत अशी उद्घोषणा करावी असे लिहून दिले.

पायलटने कोणताच उशीर न करता जाहीरपणे ही गूड न्यूज तिच्या नवºयाला सांगितली. उद्घोषणा होत असताना अनेक प्रवाशांनी त्या दोघांचे अभिनंदन केले. लिसाने गेल्या आठवड्यात घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या फेसबुक पेजवर अपलोड केला असून तो ३० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.  

Web Title: Pilot announced 'Good News'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.