(Image Credit : verywellfamily.com)
लहान मुलं-मुली मोठी होत असताना पालकांची नेहमीच तक्रार असते की, त्यांची मुलं अजिबात ऐकत नाहीत. अशावेळी पालकांची फारच चिडचिड होते. पण अशावेळी मुलांवर रागावण्याऐवजी याचा विचार करावा की, त्यांना कसं समजावून सांगणार. कारण त्यांना तुम्ही लहान मुलांसारखंही वागवू शकत नाही आणि ना मोठ्यांसारखं. कारण त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे तुम्हीच समजदारी काहीतरी मार्ग काढणं गरजेचं असतं.
त्यांच्यात होणाऱ्या बदलांना समजून घ्या
एक पालक असल्याच्या नात्याने हे गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये मोठे होत असलेल्या बदलांना समजून घ्या. या काळात मुला-मुलींचं मन फार अशांत राहतं आणि हे त्यांच्या शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे होतं. यासोबतच ते समाजात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या चढ-उतारात त्यांना भावनात्मक आधाराची गरज असते.
अशावेळी काय करावं?
पालक या नात्याने तुम्हाला तुमच्यावर फार संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांचा मित्र होऊन बोलण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र झालात तर तुम्ही त्यांना योग्य किंवा चूक यातील फरक समजावून सांगू शकणार नाहीत. तुम्ही स्वत:हून समजून घ्या आणि मुलांसोबत अशी बॉंडींग तयार करा की, ते स्वत:हूनच तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी सांगतील आणि तुमच्याकडून सल्ला घेतील.
आधी स्वत:त करा बदल
मुला-मुलींमध्ये चांगले गुण टाकण्याआधी तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचं उदाहरण द्याल तर ते लवकर समजू शकतील. सोबतच या वयातील मुला-मुलींसोबत घर-परिवाराबाबत बोला. त्यांच्याशी आर्थिक आणि कौंटुबिक मुद्द्यांवर बोला. तसेच त्यांच्या करिअरशी संबंधित गोष्टींवर बोला. या गोष्टी करून त्यांच्यात समजदारी आणि गंभीरता निर्माण होईल.