(Image Credit : Detroit Free Press)
डेटला जाणं हा आजकालच्या तरूणांमध्ये ट्रेन्ड झाला आहे. आधी डेट मग पुढच्या गोष्टी. नात्याची सुरूवात म्हणून डेटकडे पाहिलं जातं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, चारपैकी एक मुलगी ही रोमान्स किंवा लॉंग टर्म रिलेशनशिपच्या उद्देशाने नाही तर फुकटचं जेवण मिळते म्हणून डेटला जाते. या प्रकाराला 'फूडी कॉल' असं म्हटलं गेलं आहे. ज्यात मुलगी ज्या व्यक्तीसोबत डेटला जाते, त्याच्यावर प्रेम करण्याचा उद्देश न ठेवता फुकटचं जेवण मिळवण्यासाठी ती डेटला जाते.
रिसर्चनुसार, एका ऑनलाइन सर्व्हेत २३ ते ३३ टक्के मुलींनी हे मान्य केलं की, त्या फूडी कॉलच्या मागे असतात. कॅलिफोर्निया येथील अजुसा पॅसिफिक युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफ्रोर्निया-मेरेडच्या अभ्यासकांना हे आढळलं की, ज्या मुलींनी व्यक्तिमत्व लक्षणांच्या(सायकोपॅथी, मॅकियावेलिज्म, नार्सिसिज्म)च्या डार्क ट्रायडचा जास्त रेटींग दिलं, त्या फूडी कॉलच्या यादीत आहेत.
सोशल सायकॉलॉजी अॅन्ड पर्सनॅलिटी सायन्स नावाच्या जर्नलमध्ये एजुसा पॅसिफिक युनिव्हर्सिटीचे ब्रायन कॉलिसनने सांगितले की, 'अनेक डार्क लक्षणांना रोमांटिक संबंधात भ्रम आणि शोषण करणाऱ्या व्यवहाराशी जोडलं गेलं. ज्यात वन नाइट स्टॅंड, शारीरिक संबंधातून सूख मिळाल्याचा दिखावा किंवा विचित्र फोटो पाठवणे यांचा समावेश आहे'.
पहिल्या रिसर्चमध्ये ८२० मुलींना सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यांनी काही उत्तरे दिली ज्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणे, लिंग भूमिकांबाबत विश्वास आणि त्यांच्या फूड कॉलच्या इतिहासाला मोजता आलं. त्यांना असेही विचारण्यात आले होते की, फूडी कॉल सामाजिक रूपाने स्विकारार्ह आहे? पहिल्या ग्रुपमधील २३ टक्के मुलींना हे स्विकारलं की, त्या फूड कॉलमध्ये सहभागी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 'जास्तीत जास्त मुलींनी कधीकधी किंवा कधीच असं केलं नसेल. पण ज्या महिला एका फूडी कॉलमध्ये व्यस्त होत्या, त्यांचं म्हणनं होतं की, यात वाईट काही नाही. तसेच जास्तीत जास्त मुलींचं हे मत आहे की, फूडी कॉल फार स्विकारार्ह आहे.