झटपट रिपेअर होणारी मॅजिकल बॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 03:12 IST
‘सीलटेक’ फायबरपासून तयार केलेल्या बॅगला पडणारे छोटे छिद्र तुम्ही केवळ हाताच्या गरमीने दुरुस्त करू शकता.
झटपट रिपेअर होणारी मॅजिकल बॅग
तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे आश्चर्य वाटेल असे शोध समोर येतात. आता हर्शेल कंपनीची नवी बॅगचेच उदाहरण घ्या ना.आपण नवी बॅग घेत आणि कितीही काळजी घेतली तरी ती फाटते. आता यावर ही नवी बॅग उत्तम पर्याय ठरू शकते.‘सीलटेक’ नावाच्या फायबरपासून तयार केलेल्या या बॅगचे वैशिष्ट्य म्हणजे, बॅगला पडणारे छोटे छोटे छिद्र तुम्ही केवळ हाताच्या गरमीने दुरुस्त करू शकता. लिंडन आणि जेमी कॉरमॅक यांनी हे नवीन प्रकारचे फॅब्रिक विकसित केले आहे.थोड्या प्रमाणात फाटलेल्या जागी जर थंडी वाजली असता जसे हाता चोळून गरम करतो, तसे करून हात ठेवला तर ‘सीलटेक’ फाटलेली जागा आपोआप जोडून घेते. जेमी सांगतो की, ‘अपेक्सनीट’ विकसित केल्यानंतर पुढे काय? या प्रश्नाने आम्हाला झपाटून टाकले. सतत काही तरी नवीन करण्याचे आमचे ध्येय आहे. काही तरी हटके आणि उपयोगी म्हणून सीलटेक तयार केले. ते वॉटर रेसिस्टंट आणि मऊसुद्धा आहे.सध्या तरी केवळ लॉसन बॅकपॅक आणि सटन डफल अशा दोनच स्टाईलमध्ये ही बॅग उपलब्ध आहे. आगामी काळात वेगवेगळ्या डिझाईन्स आणि स्टाईलमध्ये बाजारात आणण्याचे कंपनीचा विचार आहे. आता यापुढे कॉरमॅक बंधू काय नवीन करतात याकडे लक्ष द्यायला हवे, नाही का?