घराचा स्वर्ग बनवायचा असेल, तर हसा मुलांच्या सोबत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:44 IST2017-08-12T16:42:01+5:302017-08-12T16:44:16+5:30

मुलांबरोबरच भावनिक बंधही होतील आणखी अतूट..

laugh with kids.. it wil make your home heaven.. | घराचा स्वर्ग बनवायचा असेल, तर हसा मुलांच्या सोबत..

घराचा स्वर्ग बनवायचा असेल, तर हसा मुलांच्या सोबत..

ठळक मुद्देमुलांबरोब हसण्याचे क्षण शोधा, एन्जॉय करा.मुलांचं आयुष्य सकारात्मक होईल.आजार दूर पळतील.भविष्यातली आव्हानं पेलण्यास मुलं सज्ज होतील.

- मयूर पठाडे

आयुष्यातलं आपलं हसणं तर जवळपास बंद झोलेलंच आहे, पण आपण घरात मुलांबरोबर तरी हसतो की नाही? आनंदाचे चार क्षण त्यांना आणि आपल्यालाही अनुभवायला देतो की नाही?
पालक त्यांच्या कामात, रोजच्या रामरगाड्याच्या चिंतेत आणि मुलंही त्यांच्या अभ्यासात, शाळा, कॉलेजच्या रुटिनमध्ये अडकलेले.
कोणालाच कोणासाठी फार वेळ नाही.
पण फार नाही, दिवसातला अगदी थोडा वेळ जरी मुलांबरोबर घालवला आणि हसण्याचे, आनंदी क्षण जर त्यांना मिळवून दिले, तर कुटुंबात आणि मुलांच्या आयुष्यातही त्यामुळे खूपच सकारात्मक बदल होऊ शकतात.
 

घरातलं हसणं काय घडवू शकतं?
१- मुलांबरोबर जर आपण हसण्याचे क्षण मिळवत असू, त्यांच्याबरोबर ते एन्जॉय करीत असू, तर मुलं आणि पालक यांच्यातले बंध खूपच चांगले, निकोप आणि अनंत काळ टिकणारे राहतील.
२- हसण्याने तुमच्यात सेन्स आॅफ ह्यूमर डेव्हलप होऊ शकतो आणि मुलं त्यानं स्मार्ट होतात.
३- मिमिक्रीसारख्या गोष्टींतून, हसण्यातून मुलं अनेक गोष्टी शिकतात. दुसºयाच्या अंतरंगात शिरण्याचाही तो एक मार्ग आहे.
४- हसण्यामुळे तुमचं केवळ आरोग्यच चांगलं राहात नाही, तर संपूर्ण घरातच एक सकारात्मक बदल होतो. असं आनंदी घर हे नेहमीच प्रगतीला पोषक असतं.
५- हसण्यामुळे तुमच्यातलं नैराश्य कमी होतं. तुमच्यातली रेझिस्टन्स पॉवर, अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६- अनेक आजार हसण्यामुळे दूर पळतात. तुमचा हार्ट रेट त्यामुळे कमी होतो. ब्लड प्रेशरचा त्रास नाहीसा होतो. नसल्यास हा त्रास होण्याची शक्यता दूर जाते.
७- आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्याचं सकारात्मक आणि आनंदी होतं.
मुलांना कायम हसतं ठेवणं ही पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर घरातलं हसरं, खेळकर वातावरण कायम मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवील.
बघा, प्रयत्न करून.
नक्की जमेल.
तुमच्या घराचा स्वर्ग बनेल..

Web Title: laugh with kids.. it wil make your home heaven..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.