(Image Credit : safeplacetherapy.com.au)

नवरा-बायको म्हणजे, भांडणं आलीच. सोशल मीडियावरही या भांडणांबाबत मीम्स आणि जोक्स व्हायरल होत असतात. ही भांडणं तातपुरती असतात. पण दरवेळी भांडणं संपून नव्याने सुरुवात होतेच असं नाही. अनेकदा भांडणामध्ये नवरा एखादी गोष्ट रागाच्या भरात बोलून जातो अन् बायकोला त्याचा फार वाईट वाटतं. याबाबत नवऱ्याला मात्र काहीच माहीत नसतं. त्याला असं वाटत असतं की, बायको स्वतःचा वेळ घेऊन शांत होईल आणि विसरून पुन्हा बोलायला येईल. पण हा त्यांचा गैरसमज असतो. 

बायकोचा राग वाढतचं जातो. अशावेळी मग बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी तिला महागडे गिफ्ट्स दिले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी दरवेळी महागड्या गिफ्टची मदत घ्यावी असं काही नाही. तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीनेही तिचा रूसवा घालवू शकता. आज आम्ही काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या बायकोचा रूसवा दूर करू शकता. 

घरातील कामांना हातभार लावा

काहीही न ऐकता किंवा काहीही न बोलता घरातील काम करायला स्वतःहून सुरुवात करा. शक्य असेल तर शक्य असेल तेवढ्या घरातील कामांना हातभार लावा. मुलांचा अभ्यासही घ्या. असं केल्याने बायकोचा रूसवा दूर होऊ शकतो. 

रागावण्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा

रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांना एखाद्या ठिकाणी घेऊन जा. त्यांना वेळ द्या. नक्की काय झालं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. 

अटेंशन द्या 

कदाचित ही गोष्ट ऐकून तुम्हाला फार विचित्र वाटेल. पण असं सांगितलं जातं की, महिलांना अटेंशन देणाऱ्या व्यक्ती फार आवडतात. त्यामुळे त्यांचा रूसवा दूर करण्यासाठी त्यांना अटेंशन द्या. 

स्पेशल पदार्थ तयार करा

जर तुम्हाला स्वयंपाक करता येत असेल तर त्यांच्यासीठी एखादा स्पेशल पदार्थ तयार करा. जर एखाद्या गोड पदार्थाची निवड केली तर सर्वात उत्तम. तसेच त्यांच्या आवडीचा पदार्थ तयार करून त्यांना स्वतःच्या हाताने भरवू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Web Title: If wife is angry dont need to spend money just follow these steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.