शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

लहान मुलांना स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना बोलू नका 'या' ५ गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 11:10 IST

प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

(Image Credit : businessinsider.com)

प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान मुलांची काळजी असते आणि ते त्यांच्याबाबत फार जास्त प्रोटेक्टिवही असतात. त्यामुळे पालक मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण हे नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की, प्रत्येक मुल या जगात आपलं वेगळेपण घेऊन येत असतं आणि ते तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीत. ते मोठे होईपर्यंत तुम्हाला त्यांची प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करणं तुमची जबाबदारी आहे.  त्यानंतर हळूहळू त्यांना सर्व चॅलेंजेस फेस करायचे असतात. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलांनी प्रत्येक स्थितीचा सामना करावा तर काही गोष्टी त्यांना अजिबात बोलू नये.

'हे तर फारच सोपंय'

(Image Credit : verywellfamily.com)

अनेकदा लहान मुलांसमोर एखादी अवघड गोष्ट असते. पण पालक त्यांना सांगतात की, ही गोष्ट अवघड नाही आणि ते आरामात करू शकतील. याचा अर्थ असा अजिबातच नाही की, असं बोलल्याने त्यांना ते काम अवघड वाटणार नाही. त्यऐवजी तुम्ही त्यांना सांगा की, ही गोष्ट त्यांच्यासाठी अवघड असल्याचं तुम्हाला माहीत आहे, पण काहीतरी मार्ग काढून हे काम तुम्ही पटकन करू शकाल. अडचण दूर करण्यासाठी त्यांना थोडं पूश करा, याने त्यांना मदत मिळेल. 

अरे..काही नाही झालं...

(Image Credit ; mix.com)

अनेकदा तुमचं मुल धावता धावता पडतं किंवा त्याला खरचटतं तेव्हा पालक मुलांना म्हणतात की, अरे...काही नाही झालंय, तू पूर्णपणे ठीक आहे. असं तुम्ही त्यांना मजबूत करण्यासाठी म्हणत असता. पण त्यांना त्यावेळी जे फील होतं. त्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे त्यांना जर जखम झाली असेल तर शांतपणे त्यांच्याजवळ जा आणि विचारा की, तू बरा किंवा बरी आहेस ना?

तुला लागेल होईल

(Image Credit : kinderling.com.au)

लहान मुलं-मुली खूप मस्ती करतात आणि असेही काम करतात ज्याने त्यांना जखम होण्याचा धोकाही असतो. अनेकदा आई-वडील ओव्हर प्रोटेक्टिव होऊ लागतात आणि ओव्हरअॅरक्ट करतात. मुलांना पुन्हा पुन्हा असं म्हणणं की, तुला लागेल, ते काम सेफ नाही, हे ऐकून मुलांना अनसेफ वाटू लागतं. त्यामुळे मुलांना जर स्टाइडवर जायचं असेल तर त्यांना जाऊद्या. जर तो पडण्याची भिती असेल तर तुम्ही तिथे त्यांना पकडण्याठी उभे रहा.

मी करते/करतो

(Image Credit : keranews.org)

अनेकदा असं होतं की, लहान मुलांना एखाद्या कठीण कामात अडकल्याचं पाहणं त्रायदायक होतं. अनेकदा असं पाहून त्यांचं काम तुम्ही स्वत: करू लागता. जेव्हा मुल एखाद्या अशा कामात अडकलं असेल त्यांना सपोर्ट करा, पण त्यांचं काम तुम्ही पूर्ण करण्यास घेऊ नका. असं केल्याने त्यांच्या आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि प्रत्येकवेळी ते तुमची किंवा इतर कुणाची मदत घेत राहतील. त्यामुळेच लहान मुलांना आव्हानांचा सामना करू द्या.

हार मानू नका

(Image Credit : daily.wordreference.com)

काहीच काम होत नाहीये, असा विचार करून तुम्ही हार मानता का? किंवा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसल्याने तुम्ही चिंता करता? हे लक्षात घ्या की, तुमचं मूल आता गोष्टी हॅंडल करणं शिकत आहे. जर ते तुम्हाला हार मानताना बघतील तर ते सुद्धा तसंच करतील. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वRelationship Tipsरिलेशनशिप