देव तारी त्याला कोण मारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 17:46 IST2016-03-20T00:46:18+5:302016-03-19T17:46:18+5:30
देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात ते ऊगाच नव्हे. या म्हणीचा प्रयत्य यावा अशी घटना नुकतीच घडली आहे.

देव तारी त्याला कोण मारी
एक 4-5 वर्षाचा मुलगा रस्त्यावरून जात असताना अचानक एक व्हॅनने धडक दिली. व्हॅनचे पुढचे चाक त्या बालकाच्या अंगावरून गेले. त्यानंतर मागचेही चाक त्या बालकाच्या अंगावरून गेले. हे दृष्य पाहताना काळजाचा ठोका चुकतो. मात्र दुसºयाच क्षणी जीव भांड्यात पडतो. कारण दोन्ही चाके या बालकाच्या अंगावरून गेली असली तरी ते बालक पुन्हा उठते आणि चक्क चालू लागते.
रस्त्यावर आपल्या डोळ्यापुढे हा चमत्कार झालेला आपण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहू शकतो. ही घटना आहे चीनमधील. या अपघातानंतर या बालकाला किरकोळ जखमा झाल्यााचे लक्षात आले. त्याला इतर काहीही मोठी दुखापत झाली नाही.
हे बालक चमत्कारिकरित्या बचावल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान या व्हॅनच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.