शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 1:55 AM

जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले.

मुंबई : जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले. आप्तेष्टांसमवेत संवाद साधण्यासाठीही त्याला वेळ कमी पडू लागला. त्यामुळे नाती दुरावली. मात्र, इतर नाती दुरावली असली तरीही मैत्रीचे नाते कायमच त्याच्या जवळ राहिले आहे; कारण मैत्री हे एक असे नाते आहे, जे लोणच्यासारखे मुरत जाते आणि त्याला वेळ, काळ आणि जागेचे बंधन नसते. त्यामुळे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मैत्रीही ‘ग्लोबल’ झाली आहे.आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘पत्रमित्राची’ जागा चॅटिंग रूमने घेतली आहे. व्हर्च्युअल फ्रेंडशिपने मैत्रीचे वर्तुळ अजून व्यापक बनत आहे. काही अपवाद वगळता या व्हर्च्युअल जगातील मैत्रीची ओढ तशीच टिकून आहे. आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि काही गप्पांमध्येच तो कधी आपला जवळचा मित्र होतो, हे कळतही नाही.काही दशकांपूर्वी ज्यांना काही कारणांमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींशी संपर्क राखता आला नाही, त्यांनाही या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकत्र आणण्याचे व्यासपीठ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले आहे. मैत्रीचे सेतू उभारण्यासाठी आज अनेक साधने अक्षरश: हात जोडून उभी आहेत. फेसबुक, गुगल प्लस, टम्बलर, लिंक्डइन, टिष्ट्वटर, जीटॉक, व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅट, इन्स्टाग्राम अशी अनेक सोशल नेटवर्किंगची माध्यमे आज मैत्रीची माध्यमे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या जगात ‘मैत्री करा, मैत्री जपा, मैत्री वाढवा’ असा जणू मंत्रजागरच अखंड चालू आहे.जगाच्या दुसऱ्या कोपºयात असणाºया मित्राला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायचेय? मग त्याला फेसबुकच्या फोटोवर टॅग करा. एखादी विनोदी घटना त्याला सांगायची आहे? तर व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅटवरून त्याला मेसेज करा. तुम्ही काढलेले फोटो पिकासावर अपलोड करून त्याला दाखवा. हे सगळे क्षणार्धात होईल इतके आभासी जग तुमच्या-आमच्या जवळ सोशल मीडियाने निर्माण केले आहे.मैत्री टिकविण्याचे काम या सोशल नेटवर्किंग साइटवरून होत असले, तरीही ती मैत्री रुजते-फुलते आणि दृढ होते ती ‘वेव्हलेन्थ’ जुळल्यानंतरच. आधीच्या पिढीमध्ये मित्र रस्त्यावर, शाळेत, कॉलेजमध्ये, मैदानावर, घराच्या बाहेर भेटत होते. आता हेच मित्र आॅनलाइनच्या ‘व्हर्च्युअल’ जगामध्ये भेटतात. त्यांचे हे नवे कट्टे आणि नवे अड्डेच आहेत. मैत्री तीच, तिचे माहात्म्यही तेच; फक्त भेटण्याच्या जागा बदलल्या. रोज भेटून गप्पा मारण्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटबॉक्सने घेतली. इतकाच काय तो फरक, बाकी ये दोस्ती... आहेच की..!२0 वर्षांनंतरमित्र आले एकत्रसोशल मीडियाच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७६ सालच्या बॅचचे विद्यार्थी जोडले गेले आहेत. या सवंगड्यांनी शाळेत १ ली ते १० वीपर्यंतची १० वर्षे आनंदात घालवली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशविदेशात ते स्थायिक झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनही उत्साहात साजरे केले आहे.२००८ साली या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन साजरे झाले. त्यानंतर २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि यंदा फेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. स्नेहसंमेलनाला मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हैदराबादसह अमेरिका, दुबई येथून मित्र-मैत्रिणी आवर्जून येतात.१९६६ ते ७६ चा शाळेतील काळ वेगळा होता. त्या वेळी मोकळे वातावरण नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या शाळेतील १९७६च्या बॅचचे सुमारे ९० माजी विद्यार्थी रोज संपर्कात असतो आणि एकमेकांची सुख-दु:खं वाटतो. शाळेतील लोकप्रिय माजी पर्यवेक्षक अनिल कुलकर्णीदेखील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाला हजर असतात, असे यापैकी एक असलेल्या आरती भाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :MobileमोबाइलrelationshipरिलेशनशिपFriendship Dayफ्रेण्डशीप डे