स्वतःविषयी गॉसिप करताय तुम्ही, हे लक्षात येतं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:19 IST2017-09-01T17:19:10+5:302017-09-01T17:19:50+5:30
अनेकजणींना वाटतं की, त्या स्वतःचं कौतुक करतात प्रत्यक्षात त्या स्वतःचं आयुष्यच इतरांना गॉसिप करायला देतात.

स्वतःविषयी गॉसिप करताय तुम्ही, हे लक्षात येतं का?
-निकिता महाजन
तपासून पहा, तुम्ही मैत्रिणी भेटला आहात. गप्पा सुरु झाल्या, आणि तुम्ही बोलायला लागल्या की काय बोलता? ऑर्डर देण्यापासून ते पुढे बाकीच्या कंटाळेर्पयत, तुला सांगते म्हणत अनेकजणी स्वतर्विषयी नको नको ते पर्सनल तपशिल सांगत बसतात. अगदी आवडता रंग, चहा ते आपल्या वैवाहिक आयुष्यातले खासगी तपशिल सांगतात आणि स्वतर्च स्वतर्विषयी गॉसिप करतात. त्यामुळे जगासमोर हसू होतं आणि आपल्या जगण्याचा पार चिवडा होतो, हे लक्षातही येत नाही.
हे सारं वाचून कुणीही म्हणेल की, असं कुणी वागणंच शक्य नाही. पण सोशल मीडीयात स्वतर्विषयी बोलबोलून आता आपण प्रत्यक्ष आयुष्यातही तसंच बोलू लागलो आहोत. मैत्रिणी भेटल्या की अनेकजणी इतक्या बोलतात की बाकीच्यांना काही बोलूच देत नाही. आणि बोलताना पर्सनल आयुष्याविषयी जी माहिती सांगतात ती इतकी खासगी असते की पुढे गावभर त्याची चर्चा होते. आणि ती चर्चा होते ही आपली लोकप्रियता आहे असं वाटणार्यांची संख्याही वाढते आहे.
फक्त या तीन गोष्टी पहा. त्यातली एक जरी तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतर्विषयी गॉसिप करताय असं समजायला हरकत नाही.
1) सतत बोलता, स्वतर्विषयी. घराविषयी, मुलांविषयी, आवडते रंग, पदार्थ, न आवडत्या गोष्टी, नवरा, सासू, आपल्या भावना हे सारं सतत बोलत असता तुम्ही?
2) स्वतर्च्या खासगी गोष्टी, बेडरुममधल्याही इतरांना जाहीर सांगता, ते ही रंगवून?
3) सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरजण कुणी स्वतर्विषयी असं बोलत असेल तर अत्यंत निर्मम, अगदी कोरडे रिप्लाय देता, टिंगल करता, टाळ्या मागता आणि मग पुन्हा स्वतर्च्या संदर्भात तसंच काही घडलं असेल तर सांगता?
या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही स्वतर्विषयीच गॉसिप करताय असं म्हणायला हरकत नाही. सावध व्हा.