Coronavirus : लॉकडाऊनमध्ये कपल्सपेक्षा जास्त आनंदी आहेत सिंगल लोक, कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:13 AM2020-03-26T11:13:06+5:302020-03-26T11:47:55+5:30

सिंगल लोक हे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांपेक्षा जास्त हॅप्पी आहेत. कसं काय?  

Coronavirus : How Single people are happier than couples in lockdown myb | Coronavirus : लॉकडाऊनमध्ये कपल्सपेक्षा जास्त आनंदी आहेत सिंगल लोक, कसे?

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये कपल्सपेक्षा जास्त आनंदी आहेत सिंगल लोक, कसे?

googlenewsNext

लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होमच्या स्थितीत लोक स्वतःला एंटरटेन करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत.  जे लोक आपल्या कुटुंबासोबत राहतात ते सु्द्धा  वेळ जाण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत.  पण सगळयात जास्त त्रास अशा लोकांना आहे जे आपल्या कुटुंबाशिवाय एकटे राहतात.  किंवा त्याचा पार्टनर नसतो. असे लोक खूप सॅड असतात. कारण चॅट करण्याासाठी त्यांच्याकडे स्पेशल असं कोणीच नसतं. पण तुमचा विश्वास बसणार नाही.  सिंगल लोक हे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांपेक्षा जास्त हॅप्पी आहेत. कसं काय?   असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला तर मग जाणून घेऊया.


 उशीरापर्यंत झोपणं

फॅमिलीसोबत राहिल्यानंतर कितीही ठरवलं तरी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. याऊलट व्यक्ती एकटा असेल तर कधीही उशीरापर्यंत झोपू शकतं.  गुड मॉर्निंग शोना, बाबू असे मेसेज पार्टनरला करण्याचं टेंशन सुद्धा नसतं. पण जर तुम्हाला एकटं राहत असताना वर्क फॉर्म होम असेल तर तुम्हाला लवकर उठावचं लागतं. 

भांडणाचं टेंशन नसतं

जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा लहान लहान गोष्टीवरून तुमच्याशी कोणीही वाद घालायला येत नाही. पार्टनरसोबत असताना  कपडे इथेच का ठेवले, हे असंच का केलं?  अशा लहान लहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता असते आणि तुम्ही फर्स्टेट  होता.  तुलनेने सिंगल असलेल्या लोकांना या गोष्टींचा सामना करावा लागत नाही. 

जबाबदारी स्वीकारावी लागत  नाही

जर तुम्ही  एकटे राहत असाल तर कामं वाटून घेणं हा प्रकार नसतो. पण पार्टनसोबत राहत असाल तर  एकावर भार येऊ नये. म्हणून कामं वाटून घ्यायला लागतात. काहीवेळा हेच कारणं तुमचं डोकेदुखी ठरत असतं. इच्छा नसताना काम करावं लागतं म्हणून चिडचिड होते.

स्वतःच्या मनाप्रमाणे कपडे घातला येतात.

जेव्हा तुम्ही पार्टनर किंवा  फॅमिलीसोबत राहत असता तेव्हा बंधन असतं पण एकटे राहता तेव्हा कधीही वाटेल तसे कपडे घालू शकता. तसंच  कधीही फ्रेंड्सना व्हिडीओ कॉल करू शकता.  कितीही वेळ फोनवर बोलू शकता.  तसंच जर तुम्ही  रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरचा कॉल कधीही येऊ शकतो. म्हणून कपडे व्यवस्थित घालून बसावं लागतं. पण सिंगल लोकांना या गोष्टींचं टेंशन नसतं.

Web Title: Coronavirus : How Single people are happier than couples in lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.