लॉकडाऊनमध्ये घरात शांतता हवीये, तर पत्नीला अजिबात बोलू नका 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 14:35 IST2020-04-05T14:25:25+5:302020-04-05T14:35:52+5:30

कारण काही गोष्टींना नकार न देणं उत्तम असतं. 

Corona virus : Things you should not say to your wife in lovkdown myb | लॉकडाऊनमध्ये घरात शांतता हवीये, तर पत्नीला अजिबात बोलू नका 'या' गोष्टी

लॉकडाऊनमध्ये घरात शांतता हवीये, तर पत्नीला अजिबात बोलू नका 'या' गोष्टी

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय नाही अशा परिस्थितीत एका खोलीत बंद असल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता असते. आज आम्ही अशा गोष्टी सांगणार ज्यामुळे तुमच्यातील वाद टळतील. कारण काही गोष्टींना नकार न देणं उत्तम असतं. 

मी घरचं काम का करू 
 

नेहमी तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तेव्हा पत्नीने घरातील काम करणं ठिक आहे. पण आता तुम्ही घरी आहात तर पार्टनरला कामात मदत करा. कामात ५०-५० अशी विभागणी करा. यामुळे कामाचं ओझ एकट्या पार्टनरवर येणारं नाही. परिणामी  होणारे वाद टळतील.

यापेक्षा मी ऑफिसला असतो तर...

लॉकडाऊनमध्ये लहानमोठ्या गोष्टींवरून वाद होत असेल तर आपलं डोकं शांत ठेवा. जर तुम्ही मी उगाच घरी आहे. ऑफिसला असतो तर बरं झालं असतं. असा डायलॉग माराल तर तुमच्या पार्टनरचं फ्रस्टेशन वाढण्याची शक्यता आहे.  म्हणून समजूतदारपणाने वागा.

मला काही वेळं एकटं राहू दे 

असं म्हटल्याने जरी वाद होत नसतील तरी तुमची पार्टनर तुमच्यावर रागावण्याची शक्यता असते. लॉकडाऊनमुळे तुम्ही कुठे बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. घरीच थांबावं लागणार आहे. त्यामुळे एकमेकांचे फुगलेलं तोंड पाहण्यापेक्षा काही दिवस उलट बोलू नका.

सतत मागे लागू नको

तुमची पत्नी जर तुम्हाला एखाद्या कामाबद्दल सतत आठवण करून देत असेल किंवा फ्यूचर प्लॅनबद्दल विचारणा करत असेल तर पार्टनरला समजावून सांगा. लॉकडाऊनमुळे आलेल्या एक्स्ट्रा जबाबदारीचं भान ठेवा. तसंच  इतरांच्या पत्नीचं उदाहरण आपल्या पत्नीला देऊ नका. कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त दुखवाल.

Web Title: Corona virus : Things you should not say to your wife in lovkdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.