शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:47 IST

तडजोडीतून मार्ग काढायची दोघांचीही तयारी असेल, तर आयुष्य होईल अधिक अर्थपूर्ण

ठळक मुद्देकिती गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि किती गोष्टी सोडून द्याव्या लागतील याचाही अंदाज हवा.आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेमाचा पाया पक्का हवा.ताण सहन करण्याची क्षमता हवी.

लग्न हा प्रत्येकासाठीच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तितक्याच जाणीवपूर्वक तो हाताळायला हवा. बºयाचदा प्रेमात पडलेले तरुण त्याकडे अगदीच लाइटली बघतात आणि मग नंतर प्रश्न निर्माण होतात.त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तडजोड. ती करायची तुमची तयारी असेल, तर तुमचं आयुष्य अधिक रोमॅँटिक आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. अर्थात ही तडजोड दोघांनीही करणं गरजेचं आहे.१. प्रेमी जिवांना इतरांपेक्षा खूप जास्त विरोध सहन करावा लागतो. त्यातून जर ते पळून गेलेच तर घरच्यांबरोबरच दोन्हीकडच्या समाजाचाही ते रोष ओढवून घेतात आणि या सगळ्याचा ताण सहन करणं दोघांनाही अवघड व्हायला लागतं. हा ताण सहन करण्याची क्षमता तुमच्यात हवी.२. अशातच लग्नापूर्वी न दिसलेल्या अनेक सवयी, चालीरिती लग्न करून एकत्र राहायला लागलं की जाणवायला, टोचायला लागतात. कारण प्रत्येक घराची, जातीची, धर्माची स्वत:ची एक संस्कृती असते. ती काही बाबतीत जुळते. काही बाबतीत जुळवून घ्यावी लागते आणि काही बाबतीत मात्र जुळवून घेणंही अवघड व्हायला लागतं. आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.३. असे विवाह यशस्वी झाल्याचीही उदाहरणं खूप असतात. पण तो विवाह यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना किती गोष्टीत तडजोड करायला लागलेली असते, किती गोष्टी सोडून द्याव्या लागलेल्या असतात, किती स्वीकाराव्या लागलेल्या असतात ते त्या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे तडजोडीला पर्याय नाही.४. कुठल्याही प्रेमविवाहात सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नांमध्ये जास्तच महत्त्वाची ठरते. ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम. कारण तो पाया पक्का नसेल, तर परिस्थिती निभावणं अजूनच अवघड होऊन बसतं. यावर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे वेगळ्या जाती-धर्माच्या जोडीदाराच्या कुटुंबाची जीवनपद्धती, त्यातल्या चालीरिती, सवयी याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणं. यापैकी कशाचा आपल्याला त्रास होऊ शकतो याचा अंदाज घेणं. त्यातलं काय बदलता येईल त्याबद्दल जोडीदाराशी बोलणं..या गोष्टी करायलाच हव्यात. तरच असे विवाह यशस्वी होऊ शकतात.