प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:47 IST2017-08-25T17:32:30+5:302017-08-26T12:47:36+5:30

तडजोडीतून मार्ग काढायची दोघांचीही तयारी असेल, तर आयुष्य होईल अधिक अर्थपूर्ण

compromise is the kea in love and intercast marriages | प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

प्रेमात पडलात, पण तडजोडीची तयारी आहे का?

ठळक मुद्देकिती गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि किती गोष्टी सोडून द्याव्या लागतील याचाही अंदाज हवा.आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेमाचा पाया पक्का हवा.ताण सहन करण्याची क्षमता हवी.

लग्न हा प्रत्येकासाठीच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तितक्याच जाणीवपूर्वक तो हाताळायला हवा. बºयाचदा प्रेमात पडलेले तरुण त्याकडे अगदीच लाइटली बघतात आणि मग नंतर प्रश्न निर्माण होतात.
त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यातली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तडजोड. ती करायची तुमची तयारी असेल, तर तुमचं आयुष्य अधिक रोमॅँटिक आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. अर्थात ही तडजोड दोघांनीही करणं गरजेचं आहे.
१. प्रेमी जिवांना इतरांपेक्षा खूप जास्त विरोध सहन करावा लागतो. त्यातून जर ते पळून गेलेच तर घरच्यांबरोबरच दोन्हीकडच्या समाजाचाही ते रोष ओढवून घेतात आणि या सगळ्याचा ताण सहन करणं दोघांनाही अवघड व्हायला लागतं. हा ताण सहन करण्याची क्षमता तुमच्यात हवी.
२. अशातच लग्नापूर्वी न दिसलेल्या अनेक सवयी, चालीरिती लग्न करून एकत्र राहायला लागलं की जाणवायला, टोचायला लागतात. कारण प्रत्येक घराची, जातीची, धर्माची स्वत:ची एक संस्कृती असते. ती काही बाबतीत जुळते. काही बाबतीत जुळवून घ्यावी लागते आणि काही बाबतीत मात्र जुळवून घेणंही अवघड व्हायला लागतं. आपण कुठपर्यंत जुळवून घेऊ शकतो याचा विचार अगोदरच करायला हवा.
३. असे विवाह यशस्वी झाल्याचीही उदाहरणं खूप असतात. पण तो विवाह यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना किती गोष्टीत तडजोड करायला लागलेली असते, किती गोष्टी सोडून द्याव्या लागलेल्या असतात, किती स्वीकाराव्या लागलेल्या असतात ते त्या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे तडजोडीला पर्याय नाही.
४. कुठल्याही प्रेमविवाहात सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नांमध्ये जास्तच महत्त्वाची ठरते. ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम. कारण तो पाया पक्का नसेल, तर परिस्थिती निभावणं अजूनच अवघड होऊन बसतं. यावर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे वेगळ्या जाती-धर्माच्या जोडीदाराच्या कुटुंबाची जीवनपद्धती, त्यातल्या चालीरिती, सवयी याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणं. यापैकी कशाचा आपल्याला त्रास होऊ शकतो याचा अंदाज घेणं. त्यातलं काय बदलता येईल त्याबद्दल जोडीदाराशी बोलणं..
या गोष्टी करायलाच हव्यात. तरच असे विवाह यशस्वी होऊ शकतात.

Web Title: compromise is the kea in love and intercast marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.