आगपेटीच्या काड्यांपासून बर्निंग केक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 16:16 IST2016-03-30T23:16:54+5:302016-03-30T16:16:54+5:30
सात हजार आगपेटीच्या काड्यांना तीन थराच्या केकच्या आकारात रचून त्यांना पेटवण्यात आले.

आगपेटीच्या काड्यांपासून बर्निंग केक
व ढदिवस असो वा मॅरेज अॅनिवर्सरी प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी केक कापणे आता जणू प्रथाच झाली आहे. केक कापण्याआधी मेणबत्ती फुंकू न विझवली जाते. इथपर्यंत सगळे ठिक आहे, मात्र जर संपूर्ण केकच जर आगपेटीच्या काड्यांपासून तयार केलेला असेल तर?
यूट्यूबवर सध्या एक व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. सात हजार आगपेटीच्या काड्यांना तीन थराच्या केकच्या आकारात रचून त्यांना पेटवण्यात आले. पहिल्या थरातील काड्यापेटवल्यानंतर एक एक करत सर्व काड्या पेट घेत असलेला हा व्हिडिया पाहण्यासाठी खूप रंजक आहे.
‘एचटीडी’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिया अपलोड करण्यात आला आहे. पहिला थराला पेटविल्यानंतर 45 सेकंदात दुसरा थर पेट घेतो आणि मग आगीचा लोट वाढतो. मग 1.30 मिनिटांतर हाच व्हिडियो वेगळ्या अँगलने दाखविण्यात येतो.
यूट्यूबवर अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह व्हिडियोजना खूप प्रसिद्धी मिळते. काही दिवसांपूर्वीच सहा हजार आगपेटीच्या काड्यांना एका रेषेत ठेवून पेटविण्याचा व्हिडियोदेखील नेटीझन्समध्ये खूप हीट ठरला होता.