शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नातं कायमचं संपवण्याआधी हे 3 प्रश्न एकदा स्वत:ला विचाराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:52 IST

काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

मुंबई : एकत्र आलेले दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव हे वेगळे असतात. काही सतत विनाकारण भांडणं उखरुन काढतात. तर काही कपल्स हे ऐकमेकांशी सगळंच शेअर करतात. काही काहीच बोलत नाहीत. काही नेहमी सोबत असतात तर काही भेटू शकत नाहीत. अशात काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

1) तुम्ही दु:खी आणि रागात आहात का?

अनेकदा काही गोष्टींवरुन भांडणं होणं ही कोणत्याही नात्यात साधारण बाब आहे. अनेकदा रागाच्या भरात तुम्ही जे बोलायचं नसतं ते बोलून जाता. नंतर त्याचा पश्चाताप करता. अशावेेळी रागात झालेल्या गोष्टींमुळे अनेक वर्षांचं नातं एकाएकी तोडणं कधीही शहाणपणाचं ठरणार नाही. आधी शांत व्हा, ती वेळ निघून जाऊ द्या. शांतपणे नात्याचा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. याचा विचार करा कि, तुम्हाला खरंच नातं संपवायचंय की, रागात तुम्ही बोलून गेलात. कारण रागाच्या भरात एकदा घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. 

2) तुमच्या पार्टनरला नातं टिकवायचं आहे?

कोणतही नातं हे एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतं. एक जरी चाक मोडलं गेलं तर गाडी पुढे जाणार नाही. दोघांमुळेच नातं तयार होत असतं. कदाचित तुम्ही शांत झाल्यावर दोघांमध्ये असलेली समस्या तुम्हाला सोडवायची असेल पण विचार करत असाल की, अनेक अडचणी आहेत. अशात जर तुमच्या पार्टनरलाही हे नातं टिकवायचं असेल तर ही एक नवी संधी समजा. दोघेही या संधीचा वापर तुमच्या नात्याचं भविष्य ठरवण्यासाठी करा. एकमेकांनी हे नातं का टिकवावं याचं निदान एक योग्य कारण द्या. 

3) हे नातं सांभाळून घेण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय का?

काही कारणांनी ठराविक वेळी नातं तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्ही हे नातं वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत का? जर तुम्हाला वाटत असेल की, हे नातं टिकवण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि आता करण्यासाठी काहीही राहिलं नाही तर तुम्ही मोकळे आहात. पण मनात हे नातं वाचवण्यासाठीची एकही शक्यता दिसत असेल तर ते करुन बघा. विषय सहज सोडून देऊ नका. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट