तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो?-मग तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:15 IST2017-08-21T16:13:34+5:302017-08-21T16:15:26+5:30
स्वतःत सुधारणा करावीशी वाटणं चूक नाही, पण स्वतःला लाथाडून ते जमणार नाही.

तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो?-मग तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत!
तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो का? खूप चिडचिड होते स्वतःवर? वाटतं सुधारुन टाकावं स्वतःचा ला. काहीच आवडत नाही. रंगरुप, आपली बुद्धीमत्ता, आपले पालक, आपली आर्थिक-सामाजिक परिस्थिती, आपल्याला येत असलेली किंवा नसलेली भाषा, आपला ड्रेसिंग सेन्स, आपले इमोशनल घोळ, आपलं बोलणं, अशी यादी करु तितकी लांबत जाते. आणि ती इतकी वाढते की, आपल्याला आपलं असं काही आवडतंच नाही. खूप राग येतो स्वतःचा . इतका की, आपण आपल्यालाच आवडत नाही. आपलं काहीच आवडत नाही. मात्र हे असं सतत होण्यानं होतं काय की, आपण स्वतःलाच लाथाडतो. आणि तसं सतत केल्यानं आपणच आपल्या वाटेत अडथळा होवून बसतो.
मुद्दा काय, सोपा आहे. एखादा माणूस आपल्याला आवडायला लागला तर विचार करा, आपण त्यासाठी काय काय करतो. माया करतो. त्यासाठी जीवाचं रान करतो,कळ सोसतो. त्याच्या आनंदात आनंद मानतो. त्याला बदलवायच्या भानगडीत पडत नाही. उलट आपण त्याच्यासारखे वागायला लागतो. आनंदी असतो. आनंद देतो. आणि मग ते प्रेम फुलतं.
हेच आपण आपल्याबाबतीत करत नाही, आपण आपल्याला स्वीकारत नाही. स्वतःचा वर प्रेम करत नाही, लाडलाड करत नाही मग कसंकाय आपलं शरीर, आपली बुद्धी आपल्याला साथ देईल? आपली प्रगती होईल?
ती नाहीच होत. आपण स्वतर्वर सतत चिडल्यानं, स्वतःला नाकारल्यानं फक्त दोष देत राहतो, कधी स्वतर्ला, कधी इतरांना. आणि त्यातून बदलत काहीच नाही. त्यामुळे नुस्ता रागराग करुनही प्रश्न सुटत नाहीत. ते वाढतातच. त्यापेक्षा या दोन गोष्टी करा.
1) जे आहे ते स्वीकारा. म्हणजे उदा. आपलं वजन खूप कमी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नाही म्हणून चिडचिड करत बसण्यापेक्षा, स्वतर्चा राग राग करण्यापेक्षा. जे आहे ते मान्य करा आणि विचारा स्वतर्ला की हे मी बदलू कसा शकतो? उत्तरं मिळवा, मार्ग काढा. कामाला लागा.
कायम हेच सूत्र पाहिजे, जे स्वतःसंदर्भात आवडत नाही, ज्यात सुधारणा करायची ते काय हे पाहून लगेच कामाला लागणं. एकेक बदल करत जाणं. त्यानं स्वतःचा अभिमान वाटू शकतो.
2) इंग्रजीत राईट अॅँगर आणि रॉँग अॅँगर अशी एक कल्पना आहे. म्हणजे काय तर नुस्ता वांझोटा राग. चिडचिड, बडबड. बदल काहीच नाही. त्यापेक्षा हा राग योग्य ठिकाणी लावा, त्यातून काहीतरी सकारात्मक घडवा. राग ही आग आहे, त्यानं स्वतर्ला जाळून खाक करायचं की दिवे उजळवून सगळीकडे प्रसन्न प्रकाश पोहचवायचा, हा निर्णय कायम आपलाच असतो.