...आणि मेस्सीच्या डोळ्यात तरळले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 17:30 IST2016-06-27T12:00:34+5:302016-06-27T17:30:34+5:30

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याची ही निवृत्ती सगळ्यांनाच चटका लावून गेली. विशेषत: त्याच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

... and tears of tears in Messi's eyes | ...आणि मेस्सीच्या डोळ्यात तरळले अश्रू

...आणि मेस्सीच्या डोळ्यात तरळले अश्रू

 
र्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी म्हणजे अनेक फुटबॉलपटूंच्या जिवाची धडकन. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याची ही निवृत्ती सगळ्यांनाच चटका लावून गेली. विशेषत: त्याच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.  कोपा  अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून झालेला पराभव  मेस्सीच्या चांगलाच जिव्हारी लागला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचलेला सामना हातातून निसटल्यानंतर मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गेल्या २३ वर्षांपासून अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पधेर्चे जेतेपद पटकावता आलेले नाही. गतवर्षी देखील अर्जेंटिनाला चिलीने धक्का देत स्पधेर्चे जेतेपद पटकावले होते. यंदाही तोच कित्ता गिरवत चिलीने अर्जेंटिनाच्या स्वप्नांना सुरूंग लावला आणि अर्जेंटिनाला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण काय, करणार खेळात जय-पराजय तर चालत राहणारच मेस्सी..हे तुझ्यापेक्षा अधिक कोण समजू शकेल!!

Web Title: ... and tears of tears in Messi's eyes