शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

डेटिंग अॅपवर हमखास भेटतात या 7 प्रकारचे विचित्र माणसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 14:43 IST

या लेखातील बऱ्याच मुद्द्याना तुम्ही रिलेट कराल. चला जाणून घेऊया ती 7 प्रकारची लोकं जी डेटिंग अॅपवर हमखास भेटतात. 

तुम्ही जर कधी डेटिंग अॅप वापरलं असेल किंवा वापरत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचा अनुभव आला असेलच. पण यात काही अशी खास लोकं असतात जी हमखास भेटतात. या लेखातील बऱ्याच मुद्द्याना तुम्ही रिलेट कराल. चला जाणून घेऊया ती 7 प्रकारची लोकं जी डेटिंग अॅपवर हमखास भेटतात. 

1) बोहल्यावर चढण्याची घाई झालेले

डेटिंग अॅपवर सिरीअस रिलेशनशिप हवे असलेले लग्नाळू लोक हमखास भेटतात. ही लोकं आपल्या लाईफ पार्टनरच्या शोधात इथे येतात आणि काही भेटींनंतर लग्नाचा विचार करतात. ते या डेटिंग अॅपचा वापर एखाद्या मॅट्रिमोनिअल साईट्ससारखा करतात. त्यामुळे अशांपासून सावध राहिलेलंच बरं. तुम्हाला काही कळायच्या आत हे लोक काहीतरी करुन ठेवतील.  

2) शब्दबंबाड व्यक्तीमत्व

अशाप्रकारचे शब्दबंबाड लोक हे तुमच्याशी चॅटींग करताना भारीभक्कम शब्द मारुन फेकण्यासाठी पुस्तकच घेऊन बसलेले असतात. पण त्यांना त्या शब्दांचा अर्थही माहित नसतो. त्यांचं प्रोफाईल सुद्धा अशाच मोठमोठ्या शब्दांनी रचलेल्या कोट्सने भरलेलं असतात. पण केवळ लेखनामुळे महिला इम्प्रेस झाल्या असत्या तर लेखकांना अच्छे दिन आले असते.

3) वन नाईट स्टॅंड किंवा ओपन रिलेशनशिप टाईप

इथे काही अशीही लोकं असतात जी केवळ चंगळ करण्यासाठी आलेली असतात. ते केवळ शारीरिक संबंधाच्या शोधात इथे लुडबूड करत असतात. काही इकडचे तिकडचे प्रश्न विचारुन झाल्यावर ते मुद्द्यावर येतात आणि ओपन रिलेशनशिपबाबत बोलायला लागतात. जर तुम्हाला काहीच अडचण नसेल तर ते त्यांचं बोलणं सुरु ठेवतात, आढेवेढे घेऊन प्रश्न विचारतात आणि जर तुम्ही काही इंटरेस्टच दाखवला नाही तर गप्प बसतात. 

4) लग्न झालेले 'मैत्री'च्या शोधात?

डेटिंग अॅपवर सगळेच सिंगल असतात याची काही गॅरंटी देता येत नाही. काही लग्न झालेली मंडळीही इथे 'मैत्री'च्या शोधात आलेली असतात. किंवा त्याहीपेक्षा आणखीही कशाच्या शोधात आलेली असतात. काही तर असाही दावा करतात की त्यांच्या पत्नीलाही त्यांच्या या प्रोफाईलबद्दल माहीत आहे आणि तिला काहीही अडचण नाही. काही तर असेही असतात जे त्यांचं लग्न झालेलं आहे हेही लपवतात.  

5) मिस्टर वर्कआउट

हे एक सर्वात कॉमन प्रोफाईल आहे. जिममधील फोटो, सिक्सपॅकचे फोटो आणि प्रोफाईल डिस्क्रिपशनमध्ये बॉडीबद्दल खूपकाही लिहिलेले हे लोक असतात. तुम्हीही फिटनेस प्रेमी असाल तर ठिक नाहीतर जय भोले...

6) जबरदस्तीचा रामराम करणारे

काही लोक हे सतत तुमचं प्रोफाईल चेक करणारे असतात. तुम्ही त्यांच्या पसंतीस उतरलेले असता. पण तुम्ही काही भाव देत नाहीत तेव्हा ते तुम्हाला सतत चेक करत असतात. ते तुम्हाला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवणार, मेसेज पाठवणार जेणेकरुन तुमचं लक्ष वेधलं जावं. पण त्यांना कुणीतरी हे सांगायलं हवं की, जर त्या महिलेला तुमचं प्रोफाईल आवडलं असतं तर तुम्ही चॅटींग करत असता. 

7) दिलजले

यात आणखी एक प्रकार म्हणजे हार्टब्रेक झालेले लोक. अशांना पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये अडकायचं असतं. कुणी आधीच्या गर्लफ्रेन्डसारखी मिळते का, या शोधात ते असतात. किंवा आपलं रडगाणं सांगण्यासाठी त्यांना कुणीतरी हवं असतं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपWomenमहिला