फेसबुक युजर्स हमखास करतात या ५ स्टुपिड चुका
By Admin | Updated: May 20, 2017 15:37 IST2017-05-20T15:37:42+5:302017-05-20T15:37:42+5:30
आपल्याही नकळत आपण फेसबुकवर कोणत्या चुका करतो?

फेसबुक युजर्स हमखास करतात या ५ स्टुपिड चुका
-ज्योती सरदेसाई
आपण भले वापरतो फेसबुक दणक्यात. पडीक असतो तिथं. लोक आपल्या फोटोंना लाइक करतात, कमेण्ट्स करतात. त्या कौतुकाची चटकही लागते. पण त्या साऱ्या भावनेच्या भरात आपण काही चुका हमखास करतो. त्या टाळल्या नाहीतर तर आॅनलाइन डेटा चोरी आणि प्रायव्हसी हॅकच्या काळात आपल्यावर मोठी आफत येवू शकते.
त्यामुळे चेक करा, तुम्ही या चुका करता आहात का?
४) फोन नंबर/मोबाईल नंबर/घराचा पूर्ण पत्ता?-डिलीट करा.
आपल्या घरचा पूर्ण पत्ता, लॅण्डलाइन नंबर, आपला मोबाइल नंबर कधीही टाइमलाइनवर टाकायचा नाही. कुणी मागितलाच तर इनबॉक्समध्ये द्या. पण टाइमलाइनवर टाकू नये. मुलींनी तर अधिक काळजी घ्यावी.
५) कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय?
तुमचा बॉस खूप चांगला असेल, त्यानं तुम्हाला एखादा भारी प्रोजेक्ट करायला दिला असेल. तरी ते काम पूर्ण होइपर्यंत तरी त्याची माहिती फेसबुकवर टाकू नये. गरज नसेल तर कधीच टाकू नये. आपलं काम ही खासगी गोष्ट आहे. त्यात काही फार मोठा विक्रम केला तरच त्याची माहिती द्यावी, अन्यथा नाही.